हदगाव वन विभागाची धाडशी कारवाई; अडिच कोटींची मालमत्ता जप्त

हदगाव :- वनविभागाच्या हद्दीमध्ये मुरूमाची अवैध उत्खनन होत असल्याची माहिती कळताच तात्काळ तेथे जाऊन वन विभागाच्या हद्दीमध्ये कसलीही  परवानगी न घेता अवैध मुरूमाचे उदखनन करणार्‍या दोन पोकलेन मशीन व सात हायवा टिप्पर वर कारवाई करून ती अर्धापूर येथे वन विभागाच्या हद्दीत जमा केले.

जवळपास अडीच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली ही कारवाई वनविभागाचे उप रक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी शरयू रुद्रावार यांनी केली.

सदरील अवैध उदखन्नान हे मनाठा येथील वन कक्ष क्रमांक 492 राखीव सर्वे नंबर195/1 मध्ये करत असताना ही कारवाई करण्यात आलीअशी माहीती यावेळी देण्यात आली.