
सांगली : केंद्र सरकारकडून सांगलीतील बेदाणा आणि कोल्हापुरी गुळास (jaggery) भौगोलिक मानांकन (जीआय तथा जिओग्राफिकल इंडिकेशन) मिळाले आहे. त्यांच्या ब्रँडिंग व निर्यातवृद्धीकरिता पणन मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. या शेतमालाच्या निर्यातवृद्धीसाठी संबंधित घटकांची कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, खरेदीदार-विक्रेते भेटीचे आयोजनावर भर दिला जात आहे.
राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई, पणनचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी निर्यात धोरणांतर्गत शेतमाल उत्पादन समूहाच्या (क्लस्टर्स) प्रामुख्याने निर्यातवृद्धी होण्याच्या अनुषंगाने
मंडळाकडून विभागीय स्तरावरून पीकनिहाय ऑनलाईन समन्वय बैठका सुरू आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती लवकरच बेदाणा व गुळाबाबतची ऑनलाईन बैठक नुकतीच झाली. त्यास अपेडाचे सहायक स्थापन करण्यात येणार आहे.
राज्यातून गतवर्षी बेदाणा निर्यात २४ ते २५ हजार टन इतकी झाली आहे. सांगली जिल्ह्याचा वाटा ८० टक्के आहे. निर्यातीतून २७० कोटींचे परकीय चलन मिळाले आहे. गुळाच्या ३.४१ लाख टन निर्यातीतून १ हजार ६३३ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या गुळाचा ५० ते ६० टक्के वाटा आहे. सौदी अरेबिया, इंडोनेशिया, श्रीलंका, नेपाळ, अमेरिकेस गूळ निर्यात झाला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला