ब्राह्म मुहूर्त उत्तिष्ठेत् – स्वास्थ्यरक्षण उपाय !

Ayurveda

लहानपणापासून घरातील मोठे सकाळी लवकर उठण्यास सांगत असतात. पहाटेची भक्तिगीते, पहाटे येणारा वासुदेव किंवा कार्तिक महिन्यात गावात निघणारी पहाटेची टाळ मृदुंग वाजवित येणारी दिंडी हे मनाला प्रसन्न करणारे असतात याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल.

आयुर्वेदात दिनचर्या म्हणजेच दररोज सकाळपासून ते रात्री पर्यंत करण्याचे आचरण सांगतांना ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत् म्हणजेच स्वस्थ व्यक्तीने प्रातःकाळी उठावे. आयुष्यभर निरोगी राहण्याकरीता ब्राह्म मुहूर्तावर उठावे.

ब्राह्म मुहूर्त म्हणजे काय?

सूर्योदयापूर्वी रात्रीचे अन्तिम प्रहराची दोन किंवा चार घटिका शिल्लक राहतात ती वेळ म्हणजे साधारण पहाटे चार ते पाच ही वेळ. गावात कोंबडा आरवतो व त्या बांगेला जाग येणे. रात्री उशीरा झोपल्याने पूर्ण झोप होत नाही किंवा लवकर झोपच येत नाही उशीरापर्यंत काम असतात ही सर्व कारणे आपण सांगत असतो. पण लवकर उठणे ही या निद्रानाशावर उपाय आहे. त्यामुळे करून बघायला हरकत नाही. स्वस्थ राहण्याकरीता सकाळी उठणे स्वास्थ्य टिकविणारे ज्ञानवृद्धी करणारे असल्याने या वेळेला महत्त्व आहे.

ब्राह्म मुहूर्ताला उठणे हे स्वस्थ व्यक्तीकरीता सांगितले आहे. याचाच अर्थ रोगी मनुष्याने असे करण्याची गरज नाही हे मुख्य आहे. रात्री घेतलेला आहार पचला की नाही हे जाणून सम्यक पाचन झाले असेल तरच उठावे. त्यापूर्वी उठू नये. म्हणजेच स्वास्थ्य टिकविणाचा नियम सांगितला पण या नियमाला अपवादपण सांगितले. लवकर जेवण केले तर पाचनही लवकर होईल पण एखादवेळी जड जेवण झाले किंवा पचले नसेल तर झोपणे हा त्यावरचा उपाय आहे म्हणूनच म्हटले आहे .

ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत् – जीर्ण अजीर्ण निरूपयन् ।

  • ब्राह्म मुहूर्ताचा काळ शरीरातील मनावरील मळ दूर करून नवीन स्वच्छ सुरवात करण्याचा काळ.
  • या काळात अपान वायू कार्यकारी असतो त्यामुळे मलनिस्सरण शरीर शुद्धी त्रास न होता वा कुंथावे लागत नाही.
  • भविष्यात मलबद्धता, मूळव्याधीसारखे आजार होत नाहीत.
  • या काळात मलः निस्सरणानंतर घेतलेली च्यवनप्राश सारखी रसायन उत्तम कार्य करतात.
  • असा हा ब्राह्म मुहूर्त केवळ दिवाळीच्या अभ्यंग स्नानादिवशी अनुकरणीय नसून स्वास्थ्यरक्षणार्थ रोज उठण्याचा !

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER