ब्रॕडमन यांच्या टोपीला मिळाली 3 लाख 40 हजार डॉलरची किंमत

Bradman

ब्रॕडमन यांच्या 1928 मधील कसोटी पदार्पणाच्या टेस्ट कॕपला (बॕगी ग्रीन) 3 लाख 40 हजार डॉलरची (4 लाख 50 हजार आॕस्ट्रेलियन डाॕलर) घसघशीत विक्रमी किं मत मिळाली आहे. ब्रॕडमन यांच्या काही कॕपचा याच्याआधीसुध्दा लिलाव करण्यात आला आहे. त्यात 1948 च्या अॕशेस दौऱ्यावरच्या त्यांच्या टोपीला 4 लाख 25 हजार आॕस्ट्रेलियन डॉलर एवढी रक्कम 2003 मध्ये मिळाली होती. आता त्यापेक्षाही अधिक रक्कम मिळाली आहे. एका आॕस्ट्रेलियन व्यापाऱ्याने ही किंमत मोजली आहे.

आॕस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या कॕपला स्मृतीचीन्ह म्हणून मिळालेली विक्रमी रक्कम 10 लाख 7 हजार 500 आॕस्ट्रेलियन डॉलरची (7 लाख 60 हजार अमेरिकनडॉलर) आहे जी यंदाच शेन वाॕर्नच्या टोपीला मिळाली होती.

स्मृतीचिन्हे संग्रहाचा छंद असलेले पीटर फ्रीडमॕन यांनी ब्रॕडमन यांच्या कसोटी पदार्पणाची कॕप संपूर्ण आॕस्ट्रेलियात मिरवण्याची योजना आखली आहे. ते म्हणतात की, सर डॉन ब्रॕडमन हे महान आॕस्ट्रेलियन आहेत. ते केवळ खेळाच्या मैदानावरीलच सर्वात लोकप्रिय व प्रभावी व्यक्तीमत्व नाहीत तर आॕस्ट्रेलियन धैर्यवृत्ती व लढावू बाण्याचे प्रतिक आहेत.

ब्रॕडमन यांनी 1928 ते 1948 दरम्यान आॕस्ट्रेलिया

साठी 52 कसोटी सामने खेळले होते. त्यांना 1949 मध्ये ‘सर’ किताब बहाल करण्यात आला होता. 1928 मध्ये कसोटी पदार्पणावेळी मिळालेली कॕप ब्रॕडमन यांनी त्यांचे मित्र पीटर डनहॕम यांना 1959 मध्ये भेट दिली होती. डनहॕम हे अॕडिलेड येथे ब्रॕडमन यांच्या शेजारी राहतात. त्यांना अलीकडेच फसवणूकीच्या गुन्ह्यात जेल झाली आहे. गुंतवणुकदारांची सुमारे 10 लाख डाॕलर्ससाठी फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना यंदा मेमध्ये आठ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. डनहॕम यांनी फसवणूक केलेल्या काही व्यक्तींनी ब्रॕडमन यांच्या टोपीसाठी प्रयत्न केले होते आणि त्यानंतर विश्वस्तांच्या सूचनेनुसार या टोपीचा लिलाव करण्यातआला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER