मुलं प्रेमात पडल्यावर असे वागतात

boyfriend

तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करतो की नाही किंवा त्याचं किती प्रेम आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. कारण अनेकदा केवळ आकर्षणालाच प्रेम समजलं जातं आणि त्यामुळे नंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण मुलं प्रेमात पडल्यावर कसे वागतात याची काही निरीक्षणे आहेत ते खालीलप्रमाणे सांगता येतील.

  • प्रेमाची पहिली निशानी ही समजली जाते की, तुम्ही कसे दिसता किंवा तुमच्या चेहऱ्यावर डाग आले आहेत, याने त्याला काहीही फरक पडत नाही. तो केवळ तुम्हाला पसंत करतो आणि तुमच्यासोबत राहून आनंदी राहतो.

  • प्रेमात गोड गोड बोलणारे खूप असतात. प्रेमात कौतुक करणारेही खूप मिळतात. पण तुमच्या चूकांवर पांघरूण न घालता त्या तुम्हाला दाखवणारे कमी असतात. जे तुमच्यावर खरं प्रेम करतात ते कधीही तुमच्या तुमत्या चूका लपवून ठेवत नाहीत.

ही बातमी पण वाचा : एखाद्यावर तुमचे प्रेम आहे की क्रश असे ओळखा

fall in love

ही बातमी पण वाचा : म्हणून पुरुष महिलांना एकदा का होईना मागे वळून बघतात

  • जी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडली आहे ती व्यक्ती तुम्हाला खूश करण्यासाठी तुम्हाला जे ऐकायला आवडतं ते बोलत नसतो. तो तुम्हाला ते सांगत असतो जे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. अशात त्याच्या त्या गोष्टींवर नाराज होण्यापेक्षा त्याच्या प्रेमाला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

  • तुम्ही काय कपडे परिधान केले, कसे केले याने त्याला काहीही फरक पडत नाही. किंवा इतर मुली काय परिधान करतात आणि तुम्ही तसं करत नाहीत याचाही त्याला फरक पडत नसतो. कारण त्याला तुमच्या कपड्यांच्या सेन्सपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम असतं.

  • बाहेर कुठेही जाताना त्याला जर तुमच्यासोबत जाण्याची इच्छा असेल तर याला पझेसिव्हनेस समजू नका. याचा दुसरा भाग असाही असू शकतो की, त्याला प्रत्येक क्षण तुमच्यासोबत घालवायचा असेल. पण याला किती सीमा असावी हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे निर्णय तुम्ही घ्यावा.

ही बातमी पण वाचा : या राशीचे पुरुष असतात अधिक रोमँटिक आणि प्रामाणिक