बॉयफ्रेंड एवजी दुसऱ्यासोबत होणार असेल लग्न तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

breckup

प्रत्येक नाते हे लग्नापर्यंत पोहोचू शकत नाही. आपला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड सोडून दुस-यासोबतच आपल्याला लग्न करावे लागले. परंतु अशावेळी वाईट होऊनच नातं तोडणे योग्य नसते. गोडीने आणि समजूतदारपणाने नाते तोडता येऊ शकते. परंतु असे करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे खुप महत्त्वाचे असते.

ही बातमी पण वाचा : कंडोमचा शोध लागण्याआधी गर्भधारणा रोखण्यासाठी लोक वापरायच्या या विचित्र पद्धती

  • होणा-या नव-यापासून तुम्हाला काहीच लपवून ठेवायचे नसेल तर तुम्ही तुमच्या जुन्या रिलेशनविषयी त्यांना सांगा. परंतु तुमच्यातले सर्व काही सांगणे योग्य नाही. म्हणजे जर तुम्ही बॉयफ्रेंडच्या खुप जास्त क्लोज असाल तर हे त्यांना सांगण्याची गरज नाही. यामुळे नात्याच्या सुरुवातीलाच कडवटपणा येतो.

  • तुम्हाला लग्नानंतर फ्रेंडशीप ठेवायची असेल. हे योग्यही आहे. परंतु तुम्ही त्यांना लग्नात बोलावू नये. अशा वेळी एकमेकांचा सामना करणे खुप अवघड असते. त्यांच्या समक्ष एखाद्या दुस-या व्यक्तीसोबत लग्न करताना तुम्हाला योग्य वाटणार नाही.

  • जर तुमचे लग्न ठरले असेल तर तुम्ही एका झटक्यात नाते तोडून टाकावे असे नाही. तुम्ही हळुहळू दूर जायला हवे. तुम्ही एका क्षणात सगळं काही संपवल तर समोरच्याच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. कदाचित तो सहनही करु शकत नाही.

  • अनेक कपल्स जॉइन्ट अकाउंट, इंश्योरेंस पॉलिसी, प्रॉपर्टी इन्वेस्टमेंट एकत्र करतात. परंतु तुमचे ब्रेकअप होत असेल तर या सर्व गोष्टी मिटवून घ्याव्यात.

  • ज्या नात्याचे काही भविष्य नाही, ते नाते गोडीने तोडलेले चांगले असते. तुम्हाला लग्नानंतरही आपल्या लव्हरसोबत नाते ठेवावे वाटते. परंतु हे खुप अवघड असते. अशा वेळी आपण आपल्या पार्टनरसोबत प्रामाणिक राहू शकत नाही आणि प्रेमीविषयी समर्पितही राहू शकत नाही. यामुळे तुम्ही एकमेकांच्या सहमतीने वेगळे झालेलं चांगल असते.