औरंगाबादेत तरूणीची छेड काढणाऱ्या रोमिओविरूध्द गुन्हा दाखल

arrested

औरंगाबाद : मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणत तरुणीचा पाठालाग तसेच तिच्या मोबाईलवर वारंवार फोन करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दिपक अशोक पांडे (रा. क्रांतीचौक परिसर) या रोड रोमिओविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पीडित २२ वर्षीय तरूणी व दिपक पांडे हे दोघे एकाच महाविद्यालयात शिकत असून दोघेही एकमेकांचे परिचयाचे आहेत.

३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दिपक पांडे पीडितेच्या मोबाईलवर फोन करून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून तिच्याशी अश्लील व अर्वाच्च भाषेत संवाद साधुन विनयभंग केला. पीडित तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बनकर करत आहेत.