बघा.. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी काय-काय खोट बोलतात मुल..

boy-lie

जेव्हा एखाद्या मुलाला कोणती मुलगी आवडते, तेव्हा तिला इम्प्रेस करण्याच्या नादात ते अनेकदा बढाई मारतात आणि खोट बोलतात. त्यांच्या या खोट बोलल्याने काही मुली लगेच इम्प्रेस ही होतात. परंतु काही दिवसानंतर हेच खोट समोर आल्याने, त्याचा त्रास देखील मुलींना सोसावं लागत. तुमच्या सोबत असं होऊ नये म्हणून आम्ही मुलांच्या अश्या काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे ते मुलींपासून लपवितात, ते सुद्धा फक्त त्यांना इम्प्रेस करण्यासाठी. तर बघा काय आहेत ते….

  • सुरूवातीला सहाजिकच तुम्ही एकमेकांच्या पसंत-नापसंतीवर चर्चा करता. इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं तिच्या आवडीनुसार स्वतःच्या आवडी निवडीचा विचार करतात. याबाबतीत मुलं खोटं बोलतात.

  • अनेकदा मुलं त्यांच्या भूतकाळाबद्दल फार स्पष्टपणे बोलणं टाळतात. समोरच्या व्यक्तीला वर वर पाहता जितकी आवश्यक माहिती असते तितकीच दिली जाते. त्यामुळे ब्रेकअपची खरी कारणं फार स्प्ष्टपणे सांगत नाहीत.

  • फीटनेसच्या बाबतीतही मुलं खोटं बोलतात. अनेकदा मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं फुशारक्या मारतात.

  • इम्प्रेशन मारण्याची सवय किंवा तयारीत असणार्‍यांमध्ये पगारापेक्षा खर्च अधिक दाखवणं, परिवाराच्या स्टेट्सबाबत बोलून चढवून बोलणं ही सवय असते.

  • मुलींच्या मैत्रिणी आवडत असल्याचं नाटक करणं मुलांना चांगलं जमतं.

  • सतत आठवणींमध्ये असण्याबाबतही मुलं खोटं बोलतात.

  • अनेकदा केवळ मुलींवर इम्प्रेशन टाकण्यासाठी मुलं ते स्वतः स्त्रीवादी असल्याचं केवळ सांगतात. प्रसंगी भूमिका घेण्याची वेळ आल्यानंतर मात्र त्यांचा ‘स्त्रीवाद’ गळून पडतो.