अभ्यासाच्या कारणावरून वडिलांनी रागविले ; मुलाने केली आत्महत्या

succide

मुंबई :- हल्लीची मुलं कुठल्या गोष्टीचा राग डोक्यात घालून घेतील याचा काहीच नेम नाही. मुलाचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने वडिलांनी त्याला रागविले म्हणून मुलाने सरळ आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. हि घटना नवी मुंबईतील सेक्टर १९ मधली आहे. अभ्यास व शाळेत जाण्यावरून वडील रागावल्याने घर सोडून गेलेल्या १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. हा मुलगा २ तारखेला घर सोडून गेला होता. त्यानंतर कोपरखैरणे सेक्‍टर १९ मधील झाडाला लटकत असलेला मृतदेह सापडला.