युएस ओपन टेनिसचे आयोजक खेळाडूंवर एवढे कठोर का झाले?

Bouchard Behind USTA harsh decision

कोरोनाच्या साथीतही युएस ओपन (US Open) ग्रँड स्लॅम टेनिस (Tennis) स्पर्धेचे आयोजक स्पर्धा घेत आहेत पण त्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या बरे-वाईट काहीही होण्याची जबाबदारी त्यांनी सर्वस्वी खेळाडूंवर ढकलली आहे. हा सेफ गेम खेळताना युएस टेनिस असोसिएशन (USTA) खेळाडूंकडून तसे संमतीपत्रच (Waiver) लिहून घेतले जाणार आहे. या संमतीपत्रानुसार युएस ओपनमध्ये सहभागाने इजा, हानी वा गंभीर आजार उद्भवल्यास किंवा प्रसंगी मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी आमची स्वतःची राहील असे खेळाडूंकडून लिहून घेण्यात येणार आहे.

ही बातमी पण वाचा : युएस ओपन आयोजकांनी टेनिसपटूंवर टाकला बॉम्बगोळा

याप्रकारे आयोजक USTA ने आपली जबाबदारी झटकली असली तरी अशी कठोर भूमिका त्यांनी घेण्यामागची काही कारणे आहेत. गेल्या काही वर्षात अशा काही घटना घडल्या आहेत की त्यात युएसटीएविरुध्द दावे ठोकण्यात आले होते आणि त्याची त्यांना भारी किंमत मोजावी लागली होती.

2015 मध्ये कॅनेडियन टेनिसपटू युजिनी बुचार्ड (Eugene Bouchard) हिने युएसटीएविरुध्द दावा ठोकला होता. युएस ओपनच्या स्पर्धाठिकाणी म्हणजे नॕशनल टेनिस सेंटरच्या ट्रेनर रुममध्ये फ्लोअर क्लिनिंग लिक्विडमुळे ती घसरुन पडली होती. त्यामुळे तिला डोक्याला मार लागला होता आणि त्यावर्षीच्या युएसओपनचे एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरीचे सामने ती खेळू शकली नव्हती. शिवाय त्यावर्षीच्या नंतरच्या स्पर्धांनाही तिला मुकावे लागले होते. त्यामुळे बुचार्डने युएसटीएविरुध्द निष्काळजीपणाचा दावा ठोकला होता. त्याची प्रक्रिया अडीचवर्ष चालल्यावर युएसटीएला बुचार्डला नुकसान भरपाई देणे भाग पडले होते.

हा अनुभव पाहता आता युएसटीएने अमेरिकेतील कोरोनाची साथ पाहाता हे खबरदारीचे पाउल उचलले आहे आणि आता आपल्यावर कोणत्याही प्रकारे जबाबदारी येणार नाही असे संमतीपत्रच खेळाडूंकडून लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER