बाटलीबंद पाण्याचा साठा जप्त : विनापरवाना उत्पादन केले जात असल्याचे कारण

Water-Supply

सांगली :- अन्न व औषध प्रशासनाने जत मधील पिण्याचे बाटलीबंद पाण्याचे वेव्ह बँड वितरण करणारे मे. हुसेन नदाफ यांच्या गोडावूनवर छापा टाकून विनापरवाना उत्पादन केलेले 87 हजार 440 रूपये किंमतीचा 4 हजार 373 लिटर बाटलीबंद पाण्याचा साठा जप्त केला. आहे. विजापूर येथे बाटलीबंद करण्यात येत असलेल्या या पाण्याच्या तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

चौगुले म्हणाले, पाण्याचे उत्पादन विजापूर येथील मे. राधालोक मिनरल्स ऍण्ड कंपनी यांनी केल्याचे लेबलवरून दिसून आले. या प्रकरणी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जत शहरातील हातगाडीवर अन्न पदार्थ विक्री करणार्‍या विक्रेत्यांच्या तपासणी करण्यात आल्या. त्यांना स्वच्छता ठेवण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मे. एस. एल. बेकर्स केक्स स्वीटस, महाराणा प्रताप चौक जत, मे. संत किनाराम हॉटेल्स, मे. हैद्राबाद टी पॉईन्टस, मे. ओंकार स्वीटमार्ट, मे. ए-वन चायनिज सेंटर व मे. बालाजी बाजार सोलनकर चौक, जत येथे तपासणी करण्यात आली.

जलसंपदा विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या परीक्षा एकाच दिवशी