अशोक चव्हाण यांना म्होरक्या करून दोन्ही पक्ष गंमत बघत आहेत – रावसाहेब दानवे

Ashok Chavan-Raosaheb Danave

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना आपला म्होरक्या करून सत्तेत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष केवळ गंमत बघण्याचे काम करतायेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने धरणे धरण्यात आले होते. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

यावेळी दानवे म्हणाले, की मराठा समाजास आरक्षण मिळावे, अशी भाजपची (BJP) स्पष्ट भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. तामिळनाडूमधील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक असून या संदर्भातील प्रकरण पूर्ण पीठाकडे सोपवताना सर्वोच्च न्यायालयाने तेथील आरक्षणास स्थगिती दिलेली नाही. मराठा आरक्षणाचा विषय पूर्णपीठाकडे सोपविताना या आरक्षणास मात्र स्थगिती दिलेली आहे. राज्य सरकारने आपली बाजू नीट मांडायला हवी होती. मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन वकिलांची फौज उभी करून आरक्षण टिकवायला पाहिजे होते.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाताना त्यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या संदर्भात दानवे म्हणाले, की गर्दीमधून जाताना कदाचित त्यांचा तोल गेला असावा. आम्ही अनेकदा गर्दीमधून गेलेलो असून अशा वेळी रेटारेटी अनुभवलेली आहे. नेत्यांच्या पुढे-पुढे करणारे कार्यकर्ते गर्दी करीत असतात. एवढय़ा मोठय़ा राजकीय पक्षाच्या नेत्याला कुणी धक्काबुक्की करणार नाही.

यावेळी त्यांनी कृषी विधेयकावर भाजपची भूमिका स्पष्ट केली. संसदेत पारित झालेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र व सशक्त होणार आहे. हा कायदा आजच्या काळाची गरज आहे. एक नवीन क्रांती या शेती क्षेत्रात येणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा कायदा एक महत्त्वाचं पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे सरकार देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास वचनबद्ध आहे. “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” याच धोरणावर मोदी सरकार काम करत राहील. असा दावाही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी शेतकी विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधला. जरी पंजाब (पंजाब) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा पक्ष (कॉंग्रेस) नवीन कृषी कायद्यास विरोध करीत आहे, परंतु या कायद्यांच्या मसुद्याचा अभ्यास करणार्‍या समितीत अमरिंदरसिंग सदस्य होते. त्यामुळे सिंग यांचे सरकार या बिलांच्या बाजूने आहे, असा दावा त्यांनी केला.

सर्व पक्षांशी सविस्तर चर्चा करून तिन्ही बिले सादर करण्यात आली. ‘राजकीय उद्देशाने’ त्यांचा विरोध केला जात असल्याचा त्यांनी दावा केला. “ही बिले केवळ भाजपने आणली नाहीत,” असे त्यांनी पत्रकारांना येथे सांगितले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या समितीने यावर चर्चा केली. विरोधी पक्षांकडूनही या बिलांवर सुनावणी झाली. दानवे यांनी दावा केला की, पंजाब सरकार या बिलांच्या बाजूने आहे, कारण शेतकरी आपले उत्पादन विकताना साडेआठ टक्के कर भरत होते. असा दावा त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : ‘राम’ राज्यातील हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही! – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER