लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही दोघेजण पॉझिटिव्ह!

Coronavirus Positive

संभाजीनगर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. या दोघांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या लसीकरणाची १६ जानेवारीपासून सुरुवात झाली.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण देण्यात आले. आता १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतरही कोरोना झाला, तर त्याचा फारसा त्रास जाणवत नाही, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह आले. या दोघांचे डोस पूर्ण होऊन चार ते पाच दिवस झाले. त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

चाचणीनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. शहरात कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोघांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. शंका आल्यामुळे दोघांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यामध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून आली. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी अ‍ॅटीबॉडीज् तयार होते. लस घेतल्यावरही मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम पाळावेच लागतील, असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER