मराठा आरक्षण रखडण्यास दोन्ही सरकारं जबादार : सकल मराठा समाज

Sakal Maratha Samaj

कोल्हापूर :- राठा समाजास आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवण्यास आताचे महाविकास आघाडी आणि मागील भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार जबादार आहे. मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉल येथे गुरूवारी (दि.१५) सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाजातील नेत्यांची बैठक होणार आहे. राजर्षी शाहूच्या विचाराचे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी याबैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. ही बैठक राज्यातील मराठा आंदोलनास दिशादर्शक ठरेल. जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी यांनी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीची माहिती देताना संयोजक वसंतराव मुळीक म्हणाले, म राज्य सरकारच्या अधिकारात समाजाला आरक्षणाचा कशा प्रकारे लाभ देता येईल? केंद्र सरकारकडून आरक्षणाच्या पूर्तता करुन घेण्यासाठी भविष्यात समाजाने कशा प्रकारे आंदोलन उभे करावे? याबाबत बैठकीत चर्चा होईल. यानंतर आरक्षणासाठी राज्याला दिशा देणारे आंदोलनाची कोल्हापुरातून सुरूवात होईल. राज्य सरकारच्या हातातील मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिशादर्शक ठाम भूमिका घेऊन आंदोलनाचा सामूहिक एकत्रित निर्णय या बैठकीत घेतला जाईल. समाजाच्या आरक्षणासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. समाजात कसलेही गट-तट नाहीत. जो-तो आपल्या पध्दतीने आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. या बैठकीसाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्व संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याविषयावर होणार चर्चा… न्यायिक स्तरावर टिकणारे मराठा आरक्षण आरक्षण स्थगितीनंतर थांबलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करणे. राज्य सरकारच्या अख्यारित्या मिळणारा आरक्षणाचा लाभ. सारथी संस्थेचे सबलीकरण. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षमीकरण. अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी. शासनाच्या २० विभागातील रखडलेल्या नियुक्त्या. आरक्षणाचा आंंदोलनाची पुढील दिशा ठरविणे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER