वनस्पती परीचय – आरग्वध

बऱ्याच वेळा रस्त्याच्या कडेला लांब लांब शेंगा असलेले झाड बघितले असेल. विटी दांडू मधील दांडूप्रमाणे या शेंगा जाड गोलाकार व लांब असतात. या वृक्षाला आकर्षक पिवळ्या रंगाची फुले येतात. हे वृक्ष आहे आरग्वध. मराठीत याला बहावा म्हणतात.

आयुर्वेदात (Ayurveda) अतिशय उपयुक्त वृक्ष. आरग्वध ( रोगांना नष्ट करणारे), राजवृक्ष ( सुंदर वृक्ष), शम्पाक ( कल्याणकारी फळ देणारा) चतुरंगुल, दीर्घफल, स्वर्णभूषण ( पीतवर्णी सुवर्ण सदृश पुष्प असणारा) अशी विविध पर्यायी नावे बहाव्याकरीता आली आहेत.

बाहव्याच्या शेंगामधील गर, पुष्प, पाने, मूळाची सालं औषधी प्रयोगार्थ वापरण्यात येतो.

बाहव्याच्या पान उत्तम त्वचा रोगहर आहेत. सूज, खाज सुटणे, त्वचेवर फोड येणे, विचर्चिका, दद्रू, खरूज, व्रण, त्वचेचा खाज व आग होणे अशा सर्वच त्वचा विकारावर बाहव्याच्या पानांचा लेप खूप फायदेशीर आहे. स्नानाच्या पाण्यात याची पाने टाकून स्नान करणे, चूर्णाचा उटण्याप्रमाणे वापर करणे त्वचा विकारांमधे खूप फायदेशीर आहे.

आरग्वध शेगांचा मगज उत्तम विरेचक म्हणजे पोट साफ करणारे आहे. मुख्य गोड चवीचा हा गर असतो त्यामुळे घेण्यास त्रास होत नाही. हा गर त्रास न होता बद्धकोष्ठता दूर करणारे आहे. अशक्तपणा येत नाही. हा गर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना देता येतो. मात्रा कमी जास्त करून हा गर पोट साफ करण्यास मदत करतो. दुर्बल नाजूक प्रकृतीच्या रुग्णांमधे सुद्धा बद्धकोष्ठता दूर करण्याकरीता हा बहाव्याचा मगज उपयोगी पडतो.

पोट साफ नसल्यामुळे पोट फुगणे, गुडगुड आवाज होणे, छातीवर दाब आल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसून येतात. आरग्वध फळाचा मगज पाण्यात भिजवून गाळलेला काढा उपयोगी ठरतो.

आरग्वध वातपित्तशामक व रक्तशुद्धीकर आहे. तसेच उष्णता कमी करणारे आहे. पोटातील दाह जळजळ कमी करुन मलावाटे वाढलेले पित्त कमी करणारे आरवध आहे.

असे हे विलोभनीय बाहव्याचे झाड अतिशय उपयुक्त आहे.

ह्या बातम्या पण वाचा  : 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER