किसी का दर्द मिल सके तो ले उधार… थरूर यांचा भाजपाला टोमणा

Priyanka Gandhi - Shashi Tharoor

दिल्ली : उत्तरप्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) व सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो ट्विट करत काँग्रेसचे (Congress) नेते शशी थरूर (Shashi Tharoor ) यांनी भाजपाला (BJP) उपहासात्मक टोमणा मारला – “किसी का दर्द मिल सके तो ले उधार…” प्रियंका पीडितेच्या आईचे सांत्वन करतानाचे छायाचित्र ट्विटमध्ये टाकून

शशी थरूर यांनी या फोटोसोबत ‘अनाडी’ सिनेमातील गाण्याच्या ओळी पोस्ट केल्या –

“किसी का दर्द मिल सके तो ले उधार,
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार,
जीना इसी का नाम है।”

“और हाँ ये कर दिखाने का हौंसला, दिल, जज्बात और “मौका” ऊपर वाला सब को नही देता। आप में अगर ये जज्बात हैं तो कीजिए, आपको किसने रोका है, मौका ही मौका है।” असं थरूर यांनी म्हटलं आहे. हाथरसमध्ये जाऊन राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली होती. “अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील, जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही. काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे.” असे म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER