अत्यल्प पगारवाढ : बोरीस जॉन्सन यांची कोरोना आजारात काळजी घेणाऱ्या नर्सने दिला राजीनामा

लंडन : इंग्लंडमध्ये सरकारने (England govt) या वर्षी राष्ट्रीय आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १ टक्का पगारवाढ जाहीर केली आहे. यानंतर नर्स जेनी मॅग्की (Jenny Maggie) यांनी राजीनामा (resigns) दिला आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) कोरोनामुळे आजारी असताना जेनी यांनी चार दिवस त्यांची काळजी घेतली होती. यानंतर जेनी प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. मार्च २०२० मध्ये बोरीस जॉन्सन यांना कोरोना झाल्यानंतर आयसीयूमध्ये ठेवले होते. आजारातून बरे झाल्यानंतर जॉन्सन यांनी जेनी आणि सहायक नर्स लुईस यांची प्रशंसा केली होती. ‘द इयर ब्रिटन स्टॉप्ड’ या शीर्षकाने चॅनल फोर वाहिनीने एक डॉक्युमेंटरी बनविली आहे.

तिचे प्रसारण २४ मे रोजी होणार आहे. या कार्यक्रमात जेनी म्हणाल्या, कोरोनाकाळात आम्ही जीव पणाला लावून चिक्कार कष्ट केले, मेहनत घेतली. परिचारिका, डॉक्टर हिरो आहेत याच्या गप्पा ऐकल्या. पण हे सारे मी पुन्हा करू शकेन असे मला वाटत नाही. या कामाबद्दल आम्हाला सन्मान राहू दे, पण वेळेवर पगारसुद्धा मिळाले नाहीत! वास्तविक हा आमचा हक्क आहे. जेनी मूळच्या न्यूझीलंडच्या आहेत. त्या म्हणतात, ब्रिटनमध्ये कोरोनामुळे १,२७,९५६ मृत्यू झाले. सरकारने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत. ब्रिटनमध्ये संक्रमितांची संख्या ४४,६८,३६६ आहे. सरकारने या वर्षी राष्ट्रीय आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १ टक्का पगारवाढ जाहीर केली आहे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button