ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला ; विद्यार्थिनीची मुख्यमंत्र्यांना भावनीक साद

Student's Appeal Towards CM Uddhav Thackeray

मुंबई : मार्च महिन्यात देशात कोरोना (Corona) येऊन धडकला आणि देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषित करावा लागला. तेव्हापासून मुलं गरात बंदिस्त जाली आहेत. मुलांच्या शाळा बंद म्हणून पुढे ऑनलाईन शिक्षण सुरू केले. मात्र आता सात ते आट महिन्यांपासून मुलं घरात असल्याने त्यांना आता शाळेची आठवण येत आहे. एवढेच नाही तर ऑनलाईन अभ्यासाची कुणालाही यापुर्वी सवय नसल्याने ऑनलाईन शिक्षणाला अनेक मुलं कंटाळले आहेत.

याचीच जाणिव करून देण्यासाठी एका विद्यार्थिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून लवकर शाळा सुरु करण्याची मागणी केली आहे. आम्ही घरी बसून कंटाळलो आहोत. आम्हाला शाळेची आठवण येतेय. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरु करा,” अशी भावनिक साद नांदेडमधील एका चिमुकलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घातली आहे. संस्कृती जाधव असं त्या विद्यार्थिनीचं नाव आहे.

नांदेडमधील लोहा तालुक्यातील मारतळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत संस्कृती शिकते. या शाळेत शिकवणारे शिक्षक रवी ढगे यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त पत्रलेखनाचा उपक्रम घेतला होता.

या उपक्रमात संस्कृतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित शाळा सुरु करण्याची मागणी केली आहे. “आम्ही घरी बसून कंटाळलो आहोत. आम्हाला शाळेची आठवण येतेय. ऑनलाईन शिक्षण घेऊन कंटाळा आला आहे, त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुरु करा,” असे संस्कृतीने पत्रात म्हटलं आहे. सध्या संपूर्ण शाळेत तिच्या पत्राचीच चर्चा सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER