सीमेवर तणाव : श्रीनगर-लेह वाहतुकीसाठी बंद

Border tension-Srinagar-Leh closed for traffic

लद्दाख : लद्दाखमधील पँगाँग टीएसओ (Pangong TSO) क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनच्या लष्कराने नियंत्रण रेषा बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला आहे. यामुळे सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या या आक्रमक कृतीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर-लेह महामार्ग (Srinagar-Leh Highway) नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.

संरक्षण दले आणि त्यांच्या वाहनांसाठी फक्त हा मार्ग खुला असेल. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. सतर्क  असलेल्या भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत चिनी सैन्याचा हा डाव उधळून लावला. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीन काही भागातून मागे हटला होता.

पण पँगाँग टीएसओमध्ये चिनी सैन्य तळ ठोकून आहे.  त्यामुळे या भागात संघर्षाचा भडका पुन्हा उडू शकतो, असा इशारा सातत्याने तज्ज्ञांकडून दिला जात होता. आता २९-३० ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली.

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER