बेळगावात सीमा प्रश्न चिघळला, दोन्ही राज्यांकडून एसटी बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय

Maharashtra - Karnataka Border Dispute

मुंबई : बेळगावमध्ये (Belgaum) शिवसेना (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांच्या गाडीला काळे फासल्याने वादंग पेटले आहे . महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) आगारच्या एसटी (ST) बंद झाल्याने वडापने प्रवास करण्याची वेळ आली आहे.

बेळगावमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख्याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये एसटी आगाराकडून कर्नाटक राज्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, कर्नाटक राज्यानेही महाराष्ट्रातील बस वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आ

रोज महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीच्या 25 फेऱ्या कर्नाटक राज्यात मध्ये होत होत्या. त्या सर्व बंद करण्यात आल्या आहेत. कर्नाटक राज्यातून ही तितक्याच फेऱ्या महाराष्ट्रात होत होत्या त्यासर्व फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER