बोपन्ना – शापोव्हालोव्ह जोडी युएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

Bopanna & Shapovalov in quarters

न्यूयॉर्क येथे खेळल्या जात असलेल्या युएस ओपन टेनिस (US open tennis) स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) व डेनिस शापोव्हालोव्ह (Denis Shapovalov). जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात केव्हिन क्रावित्झ व आंद्रियास मायस या सहाव्या मानांकित जर्मन जोडीला पराभूत केले. बोपन्ना – शापोव्हालोव्ह यांनी हा सामना 4-6, 6-4, 6-3 असा जिंकला. हा सामना एक तास 47 मिनिटे चालला.

या स्पर्धेत आपले आव्हान टिकवुन ठेवलेला बोपन्ना हा आता एकमेव भारतीय आहे. सुमीत नागल एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तर दिवीज शरण व निकोला कॅसिक ही जोडी दुहेरीच्या पहिल्याच फेरीत बाद झाला आहे.

उपांत्यपूर्व फेरीत बोपन्ना व शापोव्हालोव्ह जोडीचा सामना आता जील ज्युलियन रॉजर आणि होरिया टेकाओ या जोडीशी होईल.

बोपन्ना – शापोव्हालोव्ह जोडीने पहिल्या फेरीत एस्कोबेडो- रुबीन जोडीला मात दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER