बूम बूम बुमराह अडकणार विवाहबंधनात

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज बूम बूम बुमराह (Boom Boom Bumrah) नेहमीच त्याच्या दमदार कामगिरीमुळे चर्चेत असतो. यावेळी मात्र तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी त्याने अचानक बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आहे. वैयक्तिक कारणांसाठी बुमराहने माघार घेतली असली तरी आता त्याचे शुभमंगल सावधान होण्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

जसप्रीत बुमराह  (Jaspreet Bumrah) लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्या तयारीसाठीच त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली असल्याचे बीसीसीआच्या सुत्रांनी सांगितले आहे. मात्र बुमराहच्या जीवनसाथीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.

मी लग्न करत असल्याने त्या तयारीसाठी मला सुट्टी हवी आहे, असे जसप्रीत बुमराहने बीसीसीआयला सांगितले असल्याचे समजते. त्यामुळे आपल्या घातक यॉर्कर्सने जगभरातील दिग्गज फलंदाजांची विकेट घेणाऱ्या बुमराहची विकेट नेमकी कोणी घेतली, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, बुमराहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असून त्याने कॅप्शनमध्ये विचारात असणारा इमोजी शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER