चौधरी चरण सिंह विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात रामदेव बाबा आणि योगी आदित्यनाथ यांची पुस्तके

मेरठ : उत्तरप्रदेशमधील मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने नव्या अभ्यासक्रमात योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या ‘हठयोग’ आणि रामदेव (Ramdev Baba) यांच्या ‘योगाभ्यास आणि योगचिकित्सा रहस्य’ या पुस्तकांचा समावेश केला आहे. याशिवाय बशीर बद्र, कुवर बैचेन, जग्गी वासुदेव यांचीही पुस्तके निवडली आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी लिहिलेल्या ‘हठयोग’ यात हठयोगाविषयी माहिती आहे. योगींच्या पुस्तकाचे प्रकाशन गोरखनाथ ट्रस्टने केले आहे. योगी यांचे विचार विद्यार्थ्यांना वेगळा रस्ता दाखवतील असे अभ्यास मंडळाचे म्हणणे आहे. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना सक्षम बनण्याची संधी मिळेल.

रामदेव बाबा यांच्या ‘योगाभ्यास आणि योगचिकित्सा रहस्य’ या पुस्तकाचा कला शाखेच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. कला शाखेच्या तत्त्वज्ञान या विषयात आता प्रॅक्टिकल आणि थेअरी असणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२१- २२ नुसार अभ्यासक्रम मंडळाच्या झालेल्या बैठकीत नव्या अभ्यासावर शिक्कामोर्तब केले आहे. आपल्या नव्या पिढीला भारतातील सर्व क्षेत्रातील समृद्ध वारशाविषयी माहिती यातून मिळणार आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे अशी माहिती डॉ. डी. एन. सिंह यांनी दिली.

विद्यापीठाच्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात आर्यभट्ट, भास्कराचार्य, लीलावती, रामानुजन्, माधवाचार्य, स्वामी कृष्णतीर्थ यांच्या योगदानाविषयी माहिती देण्यात आली आहे. भौतिकशास्त्रात आर्यभटांचा समावेश करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button