‘आरआरआर’चा दिग्दर्शक एसएस राजामौलीवर बोनी कपूर नाराज

Bonnie Kapoor is angry with SS Rajamouli

हे संपूर्ण वर्ष बॉलिवुडमध्ये भांडणाचे असणार आहे असे चित्र वर्षाच्या पहिल्या महिन्यातच दिसू लागले आहे. मोठे कलाकार आणि निर्मात्यांनी स्वतःच्या सिनेमाच्या रिलीजच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एकमेकांशी चर्चा न करता रिलीजच्या तारखा जाहीर केल्याने बॉक्स ऑफिसवर (Box office) अनेक मोठे सिनेमे एकाच वेळेच प्रदर्शित होताना दिसणार आहे. बॉलिवुड क्लॅश टाळण्यासाठी आता निर्मात्यांनी प्रयत्न सुरु केल्याचे चित्र दिसू लागले आहे. या क्लॅशमुळेच बोनी कपूर आणि एसएस राजामौली हे दोघे एकमेकांसमोर ठाकले आहेत. बोनी कपूर (Bonnie Kapoor) राजामौलीवर (SS Rajamouli) नाराज झाल्याचे समजते.

‘बाहुबली’ सिनेमाने प्रचंड लोकप्रिय झालेला दिग्दर्शक एसएस राजामौली ने तीन-चार दिवसांपूर्वी त्याच्या बहुचर्चित ‘आरआरआर’ सिनेमाच्या रिलीजची डेट जाहीर केली होती. त्यावेळी आम्ही तुम्हाला ही बातमी देऊन राजामौली अजय देवगणच्या ‘मैदान’समोर येणार असल्याचेही सांगितले होते. राजामौलीने दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजे 13 ऑक्टोबरला ‘आरआरआर’ रिलीज करणार असल्याचे जाहीर केले होते. बोनी कपूर निर्मित आणि अजय देवगण अभिनीत ‘मैदान’ही दसऱ्याच्या मुहुर्तावरच रिलीज करण्याची घोषणा बोनी कपूर आणि अजय देवगण यांनी राजामौलीच्या घोषणेच्या अगोदर केली होती. विशेष म्हणजे राजामौलीच्या सिनेमात अजय देवगणही महत्वाची भूमिका साकारत आहे. राजामौलीने ‘आरआरआर’ची रिलीज डेट जाहीर केल्यानंतर निर्माता बोनी कपूरने राजामौलीवर नाराजी व्यक्त करीत तो अत्यंत अनप्रोफेशनल असल्याचे म्हटले आहे.

बोनी कपूरने ‘मैदान’साठी 15 ऑक्टोबरची तारीख नक्की केली होती. पण आता राजामौलीने बोनी कपूरच्या सिनेमाच्या दोन दिवस अगोदर ‘आरआरआर’ रिलीज करण्याचे ठरवल्याने मैदानपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. राजामौलीचा हा सिनेमा हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याने मैदानला प्रेक्षक मिळण्याची शक्यता फार कमी आहे. राजामौलीच्या या निर्णयाबाबत बोलताना बोनी कपूरने म्हटले, मी खूपच अपसेट झालो आहे. ही अत्यंत अनैतिक गोष्ट आहे. माझ्या ‘मैदान’ सिनेमाच्या रिलीजची डेट मी सहा महिने आधीच घोषित केली होती. सध्या कठिण परिस्थिती असून सगळ्यांनी एकत्र येऊन बॉलिवुडला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु राजामौलीने आमच्या सिनेमाच्या रिलीजची डेट ठाऊक असूनही आमच्याशी चर्चा केली नाही आणि त्याच्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली हे चुकीचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय देवगणला जेव्हा आरआरआरच्या रिलीजच्या डेटची माहिती मिळावी तेव्हा त्याने राजामौलीला मैदानबाबत सांगून बोनी कपूरशी बोलण्यासही सांगितले होेते. पण राजामौलीने तसे न करता ‘आरआरआर’ च्या रिलीजची डेट जाहीर केली. त्यामुळे आता राजामौलीविरुद्ध बोनी कपूर असा सामना रंगताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER