कोरोना स्पर्श झाल्याने होतो की द्रवाच्या थेंबातून ?- उच्च न्यायालय

Bombay Hogh court

मुंबई : कोरोना स्पर्श झाल्याने होतो की द्रवाच्या थेंबातून होतो याची माहिती द्या असे निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिलेत.

परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे मातरम् मोहिमे’त देशात परत आणताना भौतिक अंतराच्या निकषांचे उल्लंघन होते याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या संदर्भात न्यायालयाने उल्लेखित निर्देश दिलेत.

एअर इंडियाचे वैमानिक देवेन कनानी यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्या. एस. जे. काथवाला आणि एस. पी. तावडे यांच्या खंडपीठात या याचिकेची सुनावणी सुरू आहे. याबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या बैठकीतील निष्कर्षात म्हटले आहे की – दोन व्यक्तींमध्ये अंतराचे भान ठेवले तर स्पर्शाने कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होतो. दोन व्यक्तींना शेजारी बसण्याची वेळ आलीच तर शरीराचा वरचा भाग झाकणारा संरक्षित परिधान ( protective suit ) व मोजे उपयोगी आहेत. यामुळे द्रवाच्या थेंबातून होणार विष्णूचा प्रसार रोखता येतो.

गेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला – परदेशातून येताना कोरोना निगेटिव्ह असलेले किती प्रवासी भारतात आल्यानंतर कोरोना पॉझेटिव्ह आढळले याची आकडेवारी मागितली होती. याच्या उत्तरात सरकारने सांगितले की परदेशातून भारतात आलेल्या ५८,८६७ प्रवाशांपैकी केवळ २२७ प्रवासी इथे आल्यानंतर कोरोना पॉझेटिव्ह आढळलेत. हे प्रमाण ३८ टक्के आहे.

यात दिल्ली, मुंबई आणि हैद्राबादच्या विमानतळांवर कोरोना पॉझेटिव्ह आढळलेल्या प्रवाशांची माहिती देण्यात आली नाही. या विमानतळांवर १६२ विमानांमधून १८,८९६ लोक भारतात आले आहेत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER