मेट्रो स्थानकासाठी मॅन्ग्रोव्हची ३५७ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई : वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासावदवलीला जोडणाऱ्या मेट्रो (Metro) लाइनवरील भक्ती पार्क मेट्रो स्थानकासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ३५७ खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती एस. जे. कथवाल्ला आणि न्यायमूर्ती रियाज चगला यांच्या खंडपीठाने बुधवारी हा निर्णय दिला. खंडपीठाने म्हटले की, मेट्रो लाइन-४ च बांधकाम सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टिकोनातून जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे यात शंका नाही.

हायकोर्टाने मेट्रो मार्गाच्या १२०० चौरस मीटर प्रस्तावित बांधकामासाठी तसेच बांधकामावेळी वापरण्यासाठी तात्पुरत्या जोड रस्ता तयार करण्यास परवानगी दिली. हे सर्व उपक्रम कोस्टल रेग्युलेशन झोन -२ क्षेत्रात असतील. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (एमएमआरडीए) (MMRDA) मेट्रो लाइन-४ बांधण्याचे काम करणार्‍या एजन्सीने उच्च न्यायालयाची परवानगी मागितली होती. यापूर्वी कोणतेही झाड तोडण्यापूर्वी न्यायालयाची मंजूरी आवश्यक होती.

मुंबई मॅंग्रोव्ह संवर्धन युनिटच्या ताब्यात असलेल्या ४ हजार ४४४ मॅनग्रोव्ह रोपांची वनीकरणाचा खर्च एमएमआरडीएने मान्य केला. मेट्रो प्रकल्पात नष्ट झालेल्या संख्येपेक्षा दहा पटीने जास्त लागवड केली जावी, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. एमएमआरडीएला जोड रस्त्याच्या बांधकामासाठी नष्ट होणाऱ्या मॅंग्रोव्ह जंगलातील ०.१२ हेक्टर क्षेत्राच्या वनीकरणासाठीही पैसे द्यावे लागतील. असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER