९३ ला बॉम्ब ब्लास्ट झाला आणि मुंबईला ‘डॅडी’ मिळाला!

Daddy - Maharashtra Today

भारतात आरोपी तुरुंगातून सुटला की त्याची मिरवणूक निघते. हजारो लोक जमतात. फटाके फुटातात आणि डॉल्बीवर गाणी वाजतात. गुन्हेगारांवरही इतकी प्रेम करणारी जनता फक्त भारतात असू शकते. त्यातल्या त्यात मुंबईची काही बातच और. असाच एक गुन्हेगार सुटला २०१७ ला, नागपूर मध्यवर्ती कारागृहातून. नागपूरहून तो मुंबईत पोहचला. भव्य जलसा निघाला आणि त्यावेळी गाणं होतं “अरे दिवनो मुझे पेहचानो. कहां से आया मैं हू, डॉन” गुन्हेगारतर या गाण्यावर नाचत होताच सोबत होत्या त्याची पत्नी आणि मुलगी. मुंबईतली माफिया संस्कृती संपली तरी जनता कुणाला डॉन म्हणत होती. त्या डॉनचं नाव होतं ‘अरुण गवळी.’ उर्फ डॅडी.

दाऊदच्या सत्तेला सुरंग

एक काळ होता जेव्हा मुंबई बंबई म्हणून ओळखली जायची. तिथं माफियाराज चालायचा. माफियांवर आपण अनेक सिनेमे पाहिलेत. ८० च्या दशकाच्या मध्यात करीम लाला, हाजी मस्तान, अमर नाईक, अश्विन नाईक, बजा राजून, छोटा राजन, अबु सलेम असे अनेक माफिया होते त्यांचा म्होरक्या होत्या दाऊद इब्राहिम. स्वातंत्र्याच्या आधीपासूनच मुंबईत व्यापार व्हायचा. कस्टम आणि राजस्व कराचे नियम बडे तगडे होते. ती टाळण्यासाठी तस्करी सुरु झाली. जोखीम मोठी होती आणि जोखमीचा मोबदला सुद्धा.

८० च्या दशकात अमिताभने या लोकांच्या आयुष्यातल्या किस्स्यावर बरेच सिनेमे बनवले, हाजी मस्तानच्या ताब्यात मुंबईची स्मगलिंग होती. त्याने जयप्रकाश नारायण यांच्यासोबत हात मिळवले. करिम लालाच्या भावाला रहिम लालाला टपकावून दाऊतनं मुंबई अंडरवर्ल्ड हातात घेतली. आता मुंबईवर एकट्या दाऊदचा ताबा होता.

१९९३ च्या बॉम्बस्फोटानं सगळी समीकरणं बदलली. दाऊद मुंबई सोडून दुबईला पळून गेला. छोटा राजन मलेशियाला पळून गेला आणि धावता धावता भारताच्या तुरुंगापर्यंत पोहचला. अबु सलेम पळाला पण शेवटी त्याला तुरुंगात पोहचावं लागलं. मुंबईचं मैदान रिकामं झालं. १९९६ला बंबईचं नाव मुंबई झालं. शिवसेनेची सत्ता होती. मुंबईच्या राजकारणातून धार्मिकवाद अंडरवर्ल्ड पर्यंत पोहचला. गँगस्टर सुद्दा हिंदू मुस्लीम झाले.

दाऊदचा चॅप्टर संपला आणि मुंबईकरांच्या ओठी दोन गँगस्टर्सची नावं होती. अरुण नाईक आणि अरुण गवळी. अरुण गवळीनं दाऊद गँगशी पंगा घेतला. दोघांनी एकमेकांच्या गँगमधील बरीच माणसं मारली. १९९४ मध्ये अरुण गवळीचा शुटर रवींद्र सावंत यांन अमरचा भाऊ अश्विन नाईक याच्या खोपडीत गोळी मारून हत्या केली तेही न्यायालायच्या परिसरात. तुरुंगावस संपवून तो २००९ ला बाहेर आला. १९९६ ला अमर नाईकला आधीच पोलिसांनी ठार केलं होतं. २००० नंतर अरुण गवळी मुंबई अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह बनला.

२००४ ला अरुण गवळीनं चतुर चाल खेळली. ‘अखिल भारतीय सेना’ नावचा राजकीय पक्ष त्यानं बनवला. चिंचपोकळीतून निवडणूक जिंकत अरुण गवळी आमदार बनला. आता वातावरण फिरलं होतं. त्याच्यापर्यंत पोहचणं जवळपास अशक्य होतं पण एक चुक नडली. शिवसेनेचा नगरसेवक ‘कमलाकर जामसांडेकर’ची अरुण गवळीने हत्या केली. बाळासाहेबांशी पंगा त्याला महागात पडला. अरुण गवळीची तुरुंगात रवानगी झाली.

सुरुवातीच्या काळात अरुण गवळीची खरी लढाई होती एस ब्रीज गँग सोबत. अरुण गवळीच्या भावाचा त्या गँगने हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी अरुण गवळी गँगला बराच त्रास दिला होता. अरुण गवळी पहिला गँगस्टर होता ज्यानं रिअल इस्टेटची उपयुक्तता ओळखली होती. अरुण गवळीनं भायखळा, वरळी, लालबाग आणि दादरमध्ये कामा वाढवलं. कंस्ट्रक्शनच्या कामासाठी ज्यांना कोर्टाची पायरी चढायची नसायची ते लोक अरुण गवळीकडे मदत मागायचे. असं करत करत अरुण गवळी मुंबई अंडरवर्ल्डवर राज्य करत होता पण त्याच्या एका चुकीमुळं तुरुंगवास झाला. शिवसेनेच्या नगरसेवकाच्या हत्येच्या आरोपांमुळं त्याची जेलवारी आणि पॅरोलवर सुटणं सुरुच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button