बॉलिवुडमधील गटबाजी

भारतात हिंदी चित्रपटसृष्टीला (Hindi Movies) सुरुवात केली ती दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी. त्यांनी स्वतःचा स्टुडियो स्थापन करून चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. हळूहळू पंजाबी, पठाण आणि गुजराती चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात उतरले. चित्रपट निर्मिती वाढल्याने जास्तीत जास्त कलाकारांची आवश्यकता भासू लागली. त्यातूनच कलाकारांशी स्टुडियो मालक वर्षभराचे कंत्राट करू लागले आणि तेथूनच बॉलिवुडमध्ये गटबाजी सुरु झाली. काही वर्ष हे चित्र असेच होते. परंतु जेव्हा अंडरवर्ल्डचा पैसा बॉलिवुडमध्ये आला तेव्हा ही स्टुडियो पद्धत बंद होऊन सिंगल निर्मात्यांचे वर्चस्व सुरु झाले.

मुंबईत पोलिसांनी अंडरवर्ल्डचा खात्मा केल्यानंतर कार्पोरेट कंपन्या चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात उतरल्या आणि पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत गटबाजी सुरु झाली. या कंपन्यांनी ठराविक नायकांनाच काम देणे सुरु केल्याने अनेक कलाकार कामापासून वंचित राहिले. त्यासोबतच अनेक मोठ्या स्टुडियोजनीही कलाकारांचा गट बनवून चित्रपट निर्मिती सुरु केली. कलाकारांनाही स्टुडियोशी करार करणे योग्य वाटू लागले परंतु यामुळे कलाकारांचे तर नुकसान झालेच अनेक निर्मात्यांचेही झाले. यातूनच इंडस्ट्री बदनाम होऊ लागली. कलाकार आणि दिग्दर्शकांवर निर्माता संस्थेचे लेबल लावण्यात येऊ लागले. तसेच निकोप स्पर्धेऐवजी खालच्या दर्जाची स्पर्धा सुरु झाली. यात आघाडीवर आहे शाहरुख खानचा (Shahrukh Khan) गट. शाहरुख खानची स्वतःची रेड चिली ही निर्मिती संस्था असून त्याने व्हीएफएक्स स्टुडियोही सुरु केला आहे. एवढेच नव्हे तर वितरक आणि कलाकारांनाही त्याने स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या चित्रपटासमोर दुसरा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, जास्तीत जास्त चित्रपटगृहे आपल्यालाच मिळावी असे प्रयत्न शाहरुखने सुरु केले. त्यातूनच अजय देवगनच्या सन ऑफ सरदारला चित्रपटगृहे मिळू शकली नव्हती. त्यावेळी शाहरुखच्या बाजूने अनेक जण उभे राहिले पण अजयच्या बाजूने जास्त कोणी उभे नव्हते. याचे कारण केवळ शाहरुख खान आणि यशराज बॅनर.

केवळ अजय देवगनच नव्हे तर शाहरुखने आपल्या रईस चित्रपटावेळी ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) काबिलला चित्रपटगृहे कशी मिळणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली होती. पण रईसपेक्षा काबिल चांगला असल्याने बॉक्स ऑफिसवर कमी चित्रपटगृहे असूनही त्याने रईसपेक्षा जास्त व्यवसाय केला. शाहरुख खान फक्त स्वतःचेच हित पाहातो हे बॉलिवुडमध्ये सर्रास म्हटले जाते.

शाहरुखचा मित्र करण जोहरही (Karan Johar) असाच गटबाजीत निपुण आहे. करण जोहरनेच बॉलिवुडमध्ये गटबाजी सुरु केल्याचे सांगितले जाते. अभिनेता गोविंदानेच (Govinda) याबाबत सर्वप्रथम आवाज उठवला होता. त्याने करणला इंडस्ट्रीतील सगळ्यात चतुर आणि खतरनाक व्यक्ती म्हटले होते. जे करणच्या ग्रुपमध्ये सामिल व्हायला तयार नसतात त्यांना तो काम देत नाही. एवढेच तर त्या कलाकारांना चित्रपटात घेऊ नका असे तो आपल्या मित्रांनाही सांगत असे. करण जोहर खूप पोचलेला असून अजय देवगनच्या शिवाय चित्रपटाबाबत त्याने घेतलेली भूमिका सगळ्यांनाच ठाऊक आहे. शिवाय वाईट असल्याचे प्रचारित करण्यासाठी त्याने चित्रपट समीक्षक केआरकेला 25 लाख रुपये दिल्याचेही सांगितले जाते. रामगोपाल वर्माही (Ramgopal Varma) करणमुळेच मुंबई सोडून दक्षिणेत परत गेला.

करण जोहरबरोबरच आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांचे यशराज बॅनरही असेच काम करते. शाहरुख, करण आणि यशराज हे आपसातच कलाकारांना वाटून घेतात आणि चित्रपट निर्मिती करतात. तिघांचेही वेगळे बॅनर असले तरी आतून ते एकमेकांशी जोडलेलेच आहेत. त्यामुळे कलाकारांची अदलाबदली आणि डेट्सही हे तिघेही अॅडजेस्ट करून घेतात.

याशिवाय बॉलिवुडमध्ये महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचाही एक गट आहे. पण महेश भट्ट नव्या कलाकारांना घेऊन चित्रपट तयार करतो. तो नामवंत कलाकारांच्या मागेच लागत नाही. त्याच्यामुळे नव्या कलाकारांना संधी मिळते हे नक्की. मात्र महेश भट्टही नव्या कलाकारांसोबत तीन ते चार वर्षांचा करार करून त्यांना बांधून ठेवतो.

आमिर खानचीही (Aamir Khan) स्वतःची निर्मिती संस्था आहे. पण तो कुठल्याही गटबाजीत सामिल नाही. तो स्वतःला आवडेल ते चित्रपट करतो आणि स्वतःच त्यात कामही करतो. तसेच दुसऱ्या मोठ्या निर्मात्यांकडेही काम करण्यास तो तयार असतो. तसेच तो दुसऱ्यांच्या चित्रपटाला अडचणही निर्माण करीत नाही. आमिरप्रमाणेच अजय देवगननेही (Ajay Devgan) स्वतःची निर्मिती संस्था सुरु केली आहे. मात्र रोहित शेट्टीसोबत त्याचे चांगले ट्यूनिंग असल्याने या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र रोहित शेट्टीने (Rohit Shetty) अजय देवगनव्यतिरिक्त अन्य नायकांसोबत काम करून हिट चित्रपट दिले आहेत. रोहित आणि अजयही दुसऱ्यांच्या मध्ये येत नाहीत.

सलमान खान, (Salman Khan) अक्षय कुमार, (Akshay Kumar) यांच्याही निर्मिती संस्था असून सलमान खान स्वतःच्या चित्रपटात स्वतःच नायक बनतो. तो कोणाच्या मध्ये येत नाही आणि अन्य कोणी त्याच्या पुढे जात नाही. अक्षयकुमारने स्वतःचे एक वेगळे जॉनर तयार केले असून जॉन अब्राहमनेही (john Abraham) चित्रपट निर्मितीत पाऊल टाकत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

याशिवाय दीपिका पदुकोन, (Deepika padukone) अनुष्का शर्मा, (Anushka Sharma) सोनम कपूर, (Sonam kapoor) प्रियांका चोप्रा, (Priyanka Chopra) माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनीही स्वतःच्या निर्मिती संस्था स्थापन केल्या असल्या तरी त्या कुठल्याही गटबाजीत सामिल नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER