या गाण्यांशिवाय रंग कसा खेळायचा?

Holi songs

मुंबई :- आज रंगांचा माहोल आहे. अनेक नाती रंगांमधून (Holi) व्यक्त होतात. यासाठी गाणी हे माध्यमही महत्त्वाचे ठरते. रंगांची मजा गाण्यांनी अनुभवता येते. अनेक चित्रपटांमध्ये गाणी ऐकायला मिळतात. नवीन आणि जुन्या गाण्यांनाही तितकेच महत्त्व असते. ‘रंग बरसे‘ (Rang Barse song) हे गाणे तर खूपच प्रसिद्ध आहे. ‘सिलसिला’मधील (Silsila) हे गाणे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी गायले आहे.

‘खेलेंगे हम होली’ हे गाणे ‘काका’ राजेश खन्नावर चित्रित करण्यात आले आहे. ‘कटी पतंग’मधील हे गीत किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांनी गायले आहे. ‘अंग से अंग लगाना’मध्ये शाहरुख खान तर पडद्यावर आपल्या अंगावर काटा आणतो. जूही चावला हीसोबत असते! ‘होली खेले रघुवीरा’ हे ‘बागबान’मधील अनेकांना आवडणारे गाणे ! ‘बिग बी’ अमिताभ आणि हेमा मालिनी आहेत. सुपरहिट ‘शोले’मधील ‘होली के दिन’, तसेच ‘नवरंग’मधील ‘अरे जा रे हट नटखट’ त्याचप्रमाणे ‘अंग से अंग लगा’, ‘झंकारो झंकारो’, ‘लेट्स प्ले होली’ या गाण्यांचीही मेजवानी असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या लेखणीने अजरामर केलेले ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ विसरून कसे चालेल?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button