दीपिका, सारा, श्रद्धाच्या चौकशीतून संशयास्पद बाबी समोर; एनसीबीच्या तपासाला नवे वळण

Deepika Padukone - Sara Ali Khan - Shraddha Kapoor - NCB

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज चॅट हाती आल्यानंतर एनसीबी (NCB) तपास सुरु केला. या ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीमधील बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली होती. एनसीबीने या अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स पाठवलं आणि ठरलेल्या दिवशी या अभिनेत्रींची चौकशीही पार पडली. वकीलांच्या सहाय्याने दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांनी मात्र एनसीबी (NCB) समोर जाण्याची तयारी केली होती.

गोव्यामध्ये (Goa) बसून एनसीबीच्या प्रश्नांची काय उत्तर द्यायची याची व्ह्यू रचना तयार करण्यात आली आणि त्याच प्रमाणे उत्तरे देण्यात आली. ड्रग्स प्रकरणात समोर आल्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह या एनसीबीला काय उत्तर देतील, यावर साऱ्यांचे लक्ष लागून होतं. मात्र त्यांनी एनसीबी अधिकाऱ्यांच्या तापसाला वळण देणारी उत्तर या अभिनेत्रींनी दिली.

दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांसारख्या बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींची नावं होती. या अभिनेत्रींचं व्हॉट्सअॅप चॅट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती लागलं होतं. ज्यामधून स्पष्ट होतं की, या अभिनेत्री ड्रग्स संदर्भात बोलत आहेत. त्यामुळे आरोप मान्य करण्या व्यतिरिक्त या अभिनेत्रींकडे कुठलाही पर्याय नव्हता. मात्र एनसीबीला दिलेल्या उत्तरांनी या अभिनेत्रींनी स्वतःला तर वाचवलंच पण एमसीबीच्या तपासाला सुद्धा वेगळं वळण दिले .

एनसीबीच्या माहितीनुसार तिनही अभिनेत्री पूर्ण तयारी करुन एनसीबीसमोर आल्या होत्या. दीपिका आणि करिष्मा या दोघींची उत्तरं एक सारखी होती. करिष्मानं पहिल्या दिवशी आजारी असल्याचं कारण देऊन तपासासाठी गैरहजर हजर राहिली होती. आम्हाला संशय आहे की, त्यावेळेस करिष्मा आणि दीपिका वकिलांसोबत गोव्यामध्ये होत्या आणि चौकशीची एकत्र तयारी करत होत्या.’ या अभिनेत्रींकडून हे चॅट ड्रग्ज संदर्भातील आहेत असं म्हणून जर मान्य केलं असतं, तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं काम कुठेतरी सोपं झालं असतं. मात्र यांच्याकडून देण्यात आलेल्या या उत्तरावर आता एनसीबी नेमकं काय करते? ते पाहणे महत्त्वाचं असणार आहे. कारण सारा अली खान, आणि श्रद्धा कपूर यांनी स्वतः कधी ड्रग्स घेत नसल्याचे सांगून सुशांत ड्रग घ्यायचा, असे उत्तर दिले आहे. मात्र सुशांत आता हयात नाही तर या गोष्टींची टॉप्स कसा करायचा ? हा प्रश्न एनसीबी समोर असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER