बॉलिवूड ड्रग प्रकरण : अक्षय कुमारने व्हिडीओ शेअर करत सांगितलं खरं वास्तव

Akshay Kumar

मुंबई : मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये(Bollywood)चित्रपटांपेक्षा ड्रग्सबद्दल अधिक चर्चा सुरु आहे. जिथे-जिथे बॉलिवूडचा विषय निघतो, हिंदी चित्रपटांचा विषय निघतो तिथे ड्रग्सचादेखील उल्लेख होऊ लागला आहे. अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan), अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) , अभिनेत्री श्रद्धा कपूरसारख्या (Sharddha Kapoor) स्टार्सची एनसीबीने (NCB) चौकशी केली. याचदरम्यान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने ड्रग्सच्या मुद्द्यावर खरं वास्तव सादर केलं आहे. अक्षयने एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर (Social media) शेअर केलेल्या व्हिडीओसोबत अक्षय कुमारने लिहिलं आहे की, खूप दिवसांपासून मनात एक गोष्ट आली आहे. परंतु मला कळत नव्हतं की काय बोलू, कोणाशी बोलू, आज विचार केला की तुम्हा सर्वांशी ती गोष्ट शेअर करतो. खूप जड अंतःकरणाने मी तुमच्याशी आज बोलतोय. गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या मनात एक गोष्ट सारखी येत आहे. परंतु सर्वत्र इतकी नकारात्मकता आहे की, काय, किती आणि कोणाशी बोलू, हे कळत नव्हतं.

आजकाल नारकोटिक्स आणि ड्रग्सविषयी चर्चा सुरु आहे. या विषयावर मी खोटं बोलू शकत नाही. ड्रग्सबद्दलच्या अनेक गोष्टी मला मान्य काराव्या लागतील. परंतु मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की, इतर इंडस्ट्रीप्रमाणे आमच्या इंडस्ट्रीतलेही काही लोक त्याच्याशी संबंधित आहेत.

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER