बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला आई व्हायचंय !

Priyanka Chopra wants to be a mother

मुंबई : गत काळात बॉलिवूडमध्ये लग्नाचे फॅड फॅड वाढले होते. एकामागून एका अभिनेता-अभिनेत्रींचे लग्न झाले. आता मात्र त्या सर्वच अभिनेत्र्यांना आई होण्याची इच्छा आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राही मागे राहिली नाही. दीपिका पदुकोण हिच्या पाठोपाठ लग्नाच्या बोहोल्यावर चढलेल्या प्रियांकाला आता आई व्हायचंय म्हणे!.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा गरोदर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. त्याचे कारणही तसंच होते. तिने परिधान केलेल्या ड्रेसमधून तिचे पोट बेबी बंपसारखे दिसत होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण, प्रियांका आणि तिच्या आईने ही अफवा असल्याचे सांगितले. यावेळी तिने आई होण्याची रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील एका मुलाखतीत तिला फॅमिली प्लानिंगबाबत विचारले. त्यावर मला असा प्रश्न अनेकदा विचारतात. माझ्या मित्रांनाही मुले आहेत, त्यामुळे आता तू सुद्धा मुलांचा विचार कर असा सल्ला अनेक जण देत असतात. मलाही आई होण्याचा आनंद आणि अनुभव घ्यायचा आहे, असे प्रियंका म्हणाली.

याआधी निकलाही फॅमिली प्लानिंगबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी मला बाबा व्हायला नक्कीच आवडेल, तो अनुभव मला एन्जॉय करायचा आहे, असे त्याने सांगितले होते. आयुष्यात आलेला अनुभव मला मुलांसोबत शेअर करायचा आहे, असंही तो म्हणाला होता.