पडद्यावरील लैंगिक शोषणाने बेचैन झाल्या या नायिका

bollywood actress on rape scene

पूर्वीपासून हिंदी चित्रपटात (Hindhi Movie) नायिकांवर बलात्कार होतानाची दृश्ये चित्रित करण्याचा प्रघात आहे. एक तर यानिमित्ताने नायिकेकडून अंगप्रदर्शन करवून घेता येते आणि आंबटशौकीन प्रेक्षकांना खूशही करता येते. अगोदर सहनायिका किंवा नायकाच्या बहिणीवर बलात्काराचे दृश्य हमखास ठेवले जायचे. त्यानंतर नायिकांवरही बलात्कार करण्याची दृश्ये मोठ्या प्रमाणावर वाढली होती. आजही हिंदी चित्रपटांमध्ये नायिकांवर बलात्काराची दृश्ये सर्रास दाखवली जातात. मात्र या दृश्यानंतर नायिकांची मन:स्थिती काय असते याचा विचार कोणीही केलेला नाही. याबाबत बॉलिवूडच्या काही नायिकांनीच अशा दृश्यानंतर आपली मन:स्थिती काय असते हे एका कार्यक्रमात
स्पष्ट केले.

भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिनेच निर्माण केलेल्या ‘एनएच-१०’ मध्ये तिच्याशी छेडछाडीचे दृश्य ठेवले होते. त्यापूर्वी तिने कधीही अशा प्रकारचे दृश्य दिले नव्हते. या दृश्यानंतरच्या मानसिकेबाबत बोलताना अनुष्काने सांगितले, या दृश्याच्या शूटिंगनंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला होता. छेडछाड करताना त्यात कृत्रिमपणा येऊ नये असा आमचा प्रयत्न होता. या दृश्यात मला पोटात लाथा आणि बुक्क्यांचा मार खायचा होता. त्यामुळे दृश्य खरे वाटावे यासाठी सर्वच कलाकारांनी प्रयत्न केले. परंतु जेव्हा शॉट ओके झाला तेव्हा अशा छेडछाडीनंतर एखाद्या मुलीची काय स्थिती होत असेल याची मला कल्पना आली. शूटिंग झाल्यानंतर दोन दिवस मी डिप्रेशनमध्ये गेले होते. एखाद्या मुलीशी पुरुष असे कसे वागत असतील याचा विचार मी करीत होते.

आलिया भट्टनेही (Aalia Bhatt)  ड्रग्सच्या व्यवसायावर आधारित ‘उडता पंजाब’मध्ये बलात्काराचे दृश्य दिले होते. आलियाचीही अशा प्रकारचे दृश्य देण्याची ही पहिलीच वेळ होती. आलियाने या दृश्याबाबत सांगितले, या दृश्याचे शूटिंग करताना मी फार घाबरले होते; कारण असे दृश्य मी यापूर्वी कधीही दिले नव्हते. हे दृश्य वास्तव वाटावे असा प्रयत्न करण्यास मला सांगितले गेले. पण वास्तव कसे असते ते मला ठाऊक नसल्याने काय करावे ते मला कळत नव्हते. मला सांगितले की, तुझ्यावर अत्याचार होत असताना तू मोठमोठ्याने ओरड, चेहऱ्यावर तसे भाव आण, आपोआपच दृश्य खरे वाटेल. मी अगदी तसेच केले. परंतु मनात मी म्हणत होते की, हे दृश्य लवकर संपावे. खरेच महिलांवर किती आणि कसे अत्याचार होतात ते मला समजले.

दिव्या दत्तानेही (Divya Dutta) एका चित्रपटात बलात्कारित महिलेची भूमिका साकारली होती. या अनुभवाबाबत बोलताना दिव्याने सांगितले, एका चित्रपटात माझ्यावर बलात्काराचे दृश्य शूट केले जाणार होते. शूटिंगच्या वेळी दिग्दर्शक आणि सहकलाकारांसह क्रू मेंबरही अत्यंत संवेदनशीलतेने वागत होते. दृश्य पूर्ण झाल्यावर मी मनातून पूर्ण हादरून गेले होते. घरी गेल्यावर मी खूप वेळ रडत होते. या दृश्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. त्यामुळे आता जेव्हा मी अशा बलात्काराच्या बातम्या वाचते तेव्हा मला खूप राग येतो. प्रत्येक आईने आपल्या मुलाला चांगली शिकवण दिली पाहिजे असेही दिव्या दत्ताने सांगितले होते.

मनोजकुमार (Manoj Kumar) यांच्या रोटी कपडा और मकान चित्रपटात मौसमी चटर्जीवर (Mousami Chatarjee) एक बलात्काराचे दृश्य चित्रित करण्यात आले होते. हे दृश्य प्रचंड गाजले होते. पण फार कमी लोकांना ठाऊक आहे की, या दृश्याच्या वेळी मौसमी चटर्जी गरोदर होती. परंतु शूटिंग पूर्ण करायचे असल्याने मनोज कुमारने तिला गळ घातली त्यामुळे ती तयार झाली. शूटिंग पूर्ण झाले परंतु त्यानंतर काही दिवस मौसमी चटर्जी तणावात होती. एका मुलाखतीत तिने या दृश्याबाबतचे आपले दुःख व्यक्त केले होते. शूटिंगच्या वेळी खूप पीठ नाकातोंडात गेल्याने घरी गेल्यावर तिल्या उलट्याही झाल्या होत्या. घरी गेल्यानंतर खूप वेळ रडल्याचेही मौसमीने सांगितले होते.

ही बातमी पण वाचा : फक्त पाचवी ते बारावीपर्यंतच शिकलेल्या आहेत या नायिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER