कॉस्मेटिक सर्जरी आणि स्किन लाइटनिंगने स्वतःला असे सुंदर बनवले या नायिकांनी

bollywood actress

हिंदी चित्रपटांमध्ये एक वेळ नायक सुंदर नसला तरी चालते पण नायिका मात्र सुंदरच असायला हवी. चित्रपटात नायिका व्हायचे असेल तर पहिली अट ही सुंदरतेची असते. मात्र बॉलिवुडमध्ये अशाही काही नायिका आहेत ज्यांनी करिअरला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्या सुंदरतेच्या व्याख्येत बसत नव्हत्या. पण त्यांनी नायिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले. या नायिकांचे सुरुवातीचे चित्रपट आणि काही वर्षानंतरचे चित्रपट पाहिले की हा फरक लगेचच जाणवतो. नाक, ओठ कॉस्मेटिक सर्जरीने तर सावळा रंग स्किन लाइटनिंगने या नायिकांना गोरा केला आणि वेगळे रुप धारण केले.

या यादीत सर्वप्रथम भानुप्रिया गणेशन उर्फ रेखाचा उल्लेख करावा लागेल. सावन भादो चित्रपटातून रेखाने जेव्हा रुपेरी पडद्यावर आगमन केले तेव्हा ती पुढे आणखी चालेल असे कोणालाही वाटले नव्हते.

एक तर तिचे वजनही जास्त होते आणि दिसायलाही टिपिकल दक्षिण भारतीय सावळ्या रंगाची मुलगी दिसत होती. रेखाने स्वतःवर उपचार करून घेतले आणि नंतर ती अत्यंत सुंदर अशी दिसणारी नायिका झाली. रेखाला आजही स्वतःला मेंटेन ठेवते त्यामुळे ती अजूनही सुंदरच दिसते.

हेमा मालिनीला ड्रीम गर्ल म्हणून ओळखले जाते. परंतु फार कमी वाचकांना ठाऊक असेल की, जेव्हा हेमा मालिनी चित्रपटांमध्ये आली तेव्हा तिचाही रंग सावळाच होता. तिला स्वतःच्या सावळ्या रंगाचा न्यूनगंड होता. त्यामुळे हेमाने सर्वप्रथम डॉक्टरकडे धाव घेऊन स्वतःचा रंग गोरा करून घेतला. त्यानंतर हेमाचे सौंदर्य असे काही खुलले की तिला ड्रीम गर्ल म्हणून बॉलिवुडमध्ये राज कपूर यांनी प्रचारित केले आणि हेमाचे नशीबही खुलले. आजही हेमा मालिनी स्वतःच्या शरीराकडे प्रचंड लक्ष देते.

रेखा, हेमा मालिनी या दक्षिणेतील नायिकांप्रमाणेच श्रीदेवीनेही बॉलिवुडमध्ये प्रवेश केला तेव्हा ती सुद्धा सावळ्या रंगाची आणि मध्यम आकाराच्या शरीराची नायिका होती. सोलवां सावनमधली श्रीदेवी आणि नंतर चांदनी, लम्हेंमधली श्रीदेवी तुम्ही पाहाल तर तुम्हाला तिच्या रुपातील फरक अवश्य जाणवेल. श्रीदेवीने रंग तर गोरा केलाच चेहऱ्यावरही कॉस्मेटिक सर्जरी करून नाकात बदल करून घेतला होता. नाक चाफेकळी केल्याने श्रीदेवीच्या सौंदर्यात भरच पडली होती.

काजोलने जेव्हा बेखुदी चित्रपट केला तेव्हा ही भविष्यात मोठी नायिका होईल असे कोणालाही वाटले नव्हते. काजोलचा सावळा रंग ही तिची सगळ्यात मोठी कमतरता होती. मात्र काजोलने आपल्या अभिनयाच्या बळावर काही चित्रपट केले आणि नंतर स्वतःमध्ये बदलही घडवून आणला. तिने स्वतःचा रंग बदलवून तर घेतलाच शरीर स्लिम करण्यासाठीही प्रयत्न केले. आजही काजोल सुंदर दिसते त्याचे कारण हेच आहे.

दक्षिण भारतीय शिल्पा शेट्टीने जेव्हा रोनित रॉयच्या नायिकेच्या भूमिकेत काम करण्यास सुरुवात केली तेव्हा तिचा सावळा रंग सगळ्यांच्याच नजरेत खुपला होता. तो चित्रपट काही बनला नाही. पण नंतर बाजीगरमध्ये शिल्पा शेट्टी दिसली. या चित्रपटातील शिल्पा शेट्टी आणि आता एका मुलाची आई असलेली शिल्पा शेट्टी यांच्यात जमीन आसमानाचा फरक झाला आहे. काही चित्रपट हिट झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने सर्वप्रथम आपेल नाक ामि ओठ कॉस्मेटिक सर्जरी करून सुंदर करून घेतले. त्यानंतर सावळ्या रंगाचे रुपांतर गोऱ्या रंगात केले आणि आजची शिल्पा शेट्टी अवतरली.

प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड झाली आणि बॉलिवुडमध्ये तिचा प्रवेश झाला. प्रियांकाला लवकरच स्वतःच्या चेहऱ्यातील उणीवा जाणवल्या आणि तिने चेहऱ्यावर अनेक शस्त्रक्रिया करवून घेतल्या. ज्यामुळे तिचे नाक, ओठ पूर्वीपेक्षा सुंदर दिसू लागले. त्वचेचा रंग उजळावा यासाठी प्रियांकाने मेलेनिन रिडक्शन सर्जरी केल्याचेही बॉलिवुडमध्ये म्हटले जाते. यामुळे तिचा रंग चांगलाच उजळला होता.

बिपाशा बसुला आपल्या सावळ्या रंगाचा फार अभिमान होता. ती अभिमानाने सावळ्या रंगाचा उल्लेख करून म्हणायची माझा रंग सावळा असला तरी मी बॉलिवुडमध्ये यशस्वी आहे. मी माझा रंग बदलणार नाही. परंतु याच बिपाशाने नंतर जेव्हा चित्रपट मिळेनासे झाले तेव्हा स्किन लाइटनिंग करून घेतले आणि स्वतःच्या रंगात बदल केला.

याशिवाय सध्या दक्षिणेतून बॉलिवुडमध्ये यश मिळवत असलेल्या बाहुबली चित्रपटाने लोकप्रिय झालेली अनुष्का शेट्टी, नयनतारा, समंथा अक्कीनेनी, रकुल प्रीत सिंह आणि काजल अग्रवाल या नायिकांच्या नावाचाही उल्लेख करावा लागेल. या नायिकांनीही स्वतःमध्ये बदल घडवून नवे आकर्षक रूप धारण केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER