सेल्फी काढणाऱ्या चाहत्याशी सलमानचं उर्मट वर्तन

bollywood-actor-salman-khan-angry-on-selfie-seeker-fan-taking-selfie

पणजी : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने चाहत्यासोबत उर्मट वर्तन केल्याचे समोर आले आहे. सलमानने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोनच हिसकावून घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सलमानच्या या वर्तनावर टीकेची झोड उठत आहे. ज्यांच्या जीवावर अभिनेते मोठे होतात त्या चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींचं असं वर्तन कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘राधे’ चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त सलमान खान गोव्याला गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळाबाहेर येत असताना सलमान अतिशय रागावलेला दिसत होता. यावेळी एका चाहत्याने त्याची परवानगी न घेतला सेल्फी घेतल्यामुळे सलमान आणखी चिडला. त्याने रागाच्या भरात चाहत्याच्या हातातला फोन खेचून घेतला. सलमानच्या या वर्तनावर अनेकांकडून टीका होत आहे.