बॉलीवूड हादरलं! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोना

Kiran Kumar

मुंबई : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने लाखाचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातही कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे . आता बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते किरण कुमार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शिवाय त्यांचे वय सध्या ७४ वर्ष असल्याने त्यांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण कुमार यांचा कोरोना रिपोर्ट १४ मे रोजीच पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतलं आहे. आता त्यांची दुसरी चाचणी २५ मे रोजी करण्यात येणार आहे.

दरम्यान, किरण कुमार यांच्या आधी बॉलिवूडमध्ये अनेकाना कोरोनानाची लागण झाली आहे. सर्वात आधी गायिका कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर निर्माता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोआ मोरानी, शाजिया मोरानी कोरोना संक्रमित आढळल्या होत्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER