कोरोनाचे संकट : अभिनेता कार्तिक आर्यनकडून ‘पीएम फंडा’ला एक कोटीची मदत

Kartik Aaryan

नवी दिल्ली : कोरोनासोबत लढण्यासाठी सरकारने आर्थिक मदतीचं आवाहन केल्यानंतर विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचाही समावेश आहे. अभिनेता कार्तिक आर्यनने ‘पंतप्रधान साहाय्यता निधी’ला एक कोटीची मदत केली आहे. ‘आतापर्यंत मी जे कमावले, ते भारतीय नागरिकांमुळेच’ असे म्हणत कार्तिक आर्यनने देशासाठी आपलं योगदान दिलं आहे.

तुम्ही इतके असंवेदनशील कसे ? राष्ट्रवादीचे अवधूत वाघांना खडे बोल

त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘राष्ट्र म्हणून एकत्र उभं राहण्याची गरज आहे. मी जो कोणी आहे, जो पैसा मी आतापर्यंत कमावला आहे, तो फक्त भारतातील जनतेमुळे. आपल्यासाठी मी ‘पंतप्रधान साहाय्यता निधी’ला एक कोटी रुपयांचे योगदान देत आहे. मी सर्व भारतीयांना आवाहन करतो, त्यांनी आपल्या परीने शक्य तितकी मदत करावी.’

दरम्यान, मोदींनी जाहीर केलेल्या ‘जनता कर्फ्यू’नंतर कार्तिक आर्यनने नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केले होते. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला आहे .