पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रेसिंग क्षेत्रातली बोल्ड बाला ‘आलीशा’!

Maharashtra Today

पुरुषांच्या खांद्याला खादा लावून अनेक महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उभारी घेतली आहे. मग ते रसिंग क्षेत्र का असेना. आजकाल महिला देखील कार-बाईक रेसिंगमध्ये मागे राहिलेल्या नाहीत. महिला रेसर्समध्ये सर्वात आधी नाव घेतलं जातं, ते म्हणजे अलिशा अब्दुल्ला या महिला रेसरचं. अलिशा भारताची पहिली एकमात्र सुपरबाईक रेसर(Super biker) आहे. एखाद्या स्टायलिश मॉडेलसारखी दिसणारे अलिशाचे फोटो पाहिलेत तर ती रेसर आहे याची खात्री कुणालाच पटणार नाही. ज्याप्रमाणं तिचे राहिणीमान बोल्ड आहे तशी ती बोल्ड रेसरही आहे.

प्रसिद्ध बाइक रेसर आर.ए. अब्दुल्ला यांची अलिशा (Alisha)ही कन्या आहे. आर.ए. अब्दुला हे ७ वेळा नॅशनल चॅम्पियन राहिले होते. अलिशाने बालवयातच (नऊ वर्ष) रेसिंग सुरु केलं. वडिलांकडून तिला पहिली बाईक मिळाली होती. अलिशाने वयाच्या ११ वर्षीच गो-कार्टिंग रेसिंग जिंकली होती यानंतर तीन रेसिंगमध्ये करिअर करावं म्हणून तिच्या वडीलांनी ६०० सीसी बाईक अलिशा १८ वर्षाची झाल्यानंतर गिफ्ट केली होती. रोटेक्स कार्टिंग चॅलेंज, नॅशनल सुपरबाईक चॅम्पियनशिप व वोक्सवॅगन नॅशनल पोलो कप देखील अलिशानं पटकावलाय.

तो खतरनाक अपघात

कार आणि बाइक दोन्ही रेसमध्ये ती वेगवान रेसर्सपैकी एक आहे. फॉर्म्यूला – वन कारच्या शर्यतीत पाचवं स्थान पटकवल्यानंतर तीनं या क्षेत्रातही रुची असल्याचा संदेश जगाला दिला. आता तिला थांबायचं नसल्याचा संदेश. वयाच्या १५ व्या वर्षापासून ती शर्यतीत आपलं नशीब आजमावते आहे. पुरुष बाइक रेसर्ससोबतही तिनं स्पर्धा केलीये. रेसिंगबद्दल तिचं समर्पण इतकं कठोर आहे की एका जबरदस्त अपघातानंतरही ती त्यातून सावरुन पुन्हा रेसिंगच्या मैदानात उतरली. २०१० मध्ये झालेल्या या अपघातात तिला इतका जबरदस्त मार लागला होता की पुन्हा तिचं उभं राहणं जवळपास अशक्य झालं होतं. काही दिवस रेसिंगपासून दुर राहिल्यानंतर तिनं पुन्हा २०११मध्ये रेसिंगमध्ये पदारपण केलं. कधीच पराभव मान्य न करण्याचा तिला मिळालेल्या वारसा तिला भारतातली एकमेवर सर्वात वेगवान रेसर बनवतो.

वयाच्या २२ व्या वर्षी केला विक्रम

रेसिंग सोबतच फिटनेसवर तिचं विशेष लक्ष आहे. जिममध्ये वेळ घालवणं तिला सर्वाधिक आवडत असल्याचं ती वारंवार मुलाखतीत सांगते. एखाद्या गंभीर जखमीतूनही तुम्ही लवकरं बरं व्हायचं असेल तर फीट राहणं गरजेचं असल्याचं आलिशा सांगते. २२ व्या वर्षी २०११ मध्ये आलीशानं ‘व्होक्सवॅगन पोलोकप’वर स्वतःचं नाव कोरलंय. ही एक ऐताहिसक गोष्ट असून तिनं हा विक्रम स्वतःच्या नावावर करुन घेतला. शिवाय तिला व्यायामाचं वेड आहे. आलिशा एका मिनीटात ५२ पुश अप मारु शकते.

महिलांना देते रेसिंगचं ट्रेनिंग

रेसिंगच्या क्षेत्रात आलिशा पहिली असली तरी तिला एकमेव बनून राहायचं नाहीये. तिच्या सारख्या अनेक रेसर्स तिला निर्माण करायचे आहेत. अनेक सिनेमांमध्ये तिनं स्टंट वुमेनचं पात्र निभावलं आहे. तिच्या भरीव कारकिर्दीला ध्यानात घेऊन ‘फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल मोटर सायकलिंग’ने तिला भारताच्या प्रतिनिधीत्वासाठी निवडलं होतं. शिवाय ‘रेसिंग अकॅडमी फॉर वुमन’ नावची प्रशिक्षण संस्था आलिशाने उभारली असून तिथं ती मुलींना रेसिंग शिकवते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेसिंग स्पर्धा जिंकण्याचा तिचा मनोदय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button