बोलबच्चन ठाकरे सरकार करोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतात : भाजप नेत्याची टीका

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे . यावरून भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. “ऑक्सिजन नसल्यामुळे कंदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आलं. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार करोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करत आहे,”अशी टीका अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.

राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून यासाठी ठाकरे सरकारकडून (Thackeray Goverment) वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. राज्य सरकारकडून एकीकडे कंपन्यांशी चर्चा केली जात असताना इतर राज्यांमधून ऑक्सिजन कसा आणता येईल यासाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांत ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे हाल सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button