धुळ्यातील शिरपूर येथे केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; ७ जणांचा मृत्यू

shirpur blast

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडीजवळील एका केमिकल फॅक्टरीत आज,शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. वाहाडी केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट होऊन यात ७ कामगारांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. स्फोट एवढा भीषण होता की, दोन किलोमीटरपर्यंत जमीन हादरली. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : सोलापूर आगाराच्या शिवशाही बसचा भीषण अपघातात एक ठार; ११ जखमी