स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेपर्यंत मृतदेह देऊ नये; हायकोर्टाची सूचना

Mumbai Hc & Court order

मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. परिणामी अनेक रुग्ण उपचाराअभावी दगावले आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी बऱ्याच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. यासंदर्भात आता मुंबई हायकोर्टाने दखल घेतली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे.

राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला हायकोर्टाने दिले आहेत. याचबरोबर राज्यभरातील शवागृहांची स्थितीही सुधारण्यासाठी उपाययोजनाचे निर्देश दिले आहेत. दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने या सूचना दिल्या आहेत.

एकाच वेळी ३० जणांवर अंत्यसंस्कार
मागच्या दोन आठवड्यांपासून बीड जिल्ह्यामध्ये एक हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रुग्णांसोबत मृतांचाही आकडा वाढत आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांत अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या ३० रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. २८ जणांना अग्निडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग दिला होता.

स्मशानभूमी २४ तास चालू
पुण्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा दुसरा दिवस उजाडत असते. इथली स्मशानभूमी २४ तास चालू ठेव्यात येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button