
मुंबई: मुंबईत कोरोनाच्या (Corona)रुग्णांचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालीकेने रविवारी घोषित केले की, पुढच्या आठवड्यापासून मास्क न घालणा-यांना बीएमसी मोफक मास्क (Free Mask)वाटप करणार आहे.
कोरोना प्रतिबंदक नियमांचे पालन न करणा-यासासाठी बीएमसी सध्या 200 रुपये फाईन घेत आहे. लोकांमध्ये कोरोनासंबंधी जनजागृती करण्यासाठी, कोरोनाचा धोका लक्षात घेण्यासाठी मास्कचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी बीएमसीने अखेर हा निर्णय गेतला आहे.
दरम्यान, कोरोना नियमांचे पालन न करणारे लोक पाीन बरूनही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. वारंवार त्याच चुका करताना आढळून येत आहेत. त्यामुळे अखेर बीएमसीने नागरिकांकडून दंड वसूल करण्यासोबतच विनामुल्य मास्क वाटप करण्याचे ठरवले आहे.
अनलॉक झाल्यापासून सुमारे 4.85 लोकांनी कोविड नियमांचे उल्लंघन कल्याचे आढळून आले आहे. उल्लंघन करणार्यांना दंड देऊन महापालिकेने सुमारे १०.०7 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. अनलॉक केल्यामुळे अधिकाधिक लोक रस्त्यावर येऊ लागले असल्याने सप्टेंबर महिन्यात नागरी संस्थेने दंड रक्कम 2000 रुपयांवरून 200 रुपयांवर आणली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला