मुंबई मनपाच्या निवडणुकीत भाजपाची हैदराबादसारखी मुसंडी मारण्याची तयारी

Devendra fadnavis & BMC

ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने उल्लेखनीय यश संपादन केले. पार्टी त्याच यशाची पुनरावृत्ती मुंबई मनपाच्या निवडणुकीत करण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबई मनपात अनेक वर्षांपासून शिवसेनेची (Shivsena) सत्ता आहे. मुंबई मनपाची निवडणूक २०२२ साली आहे.

पण, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई भाजपाच्या (BJP) बैठकीत त्यांनी घोषणा केली की, मुंबई मनपावर भाजपाचा झेंडा फडकेल. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी फडणवीस यांना देण्यात आली होती. बिहारच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाने विधानसभा मतदारसंघनिहाय आमदारांवर जबाबदारी सोपवली आहे. या आमदारांना, त्यांना ठरवून दिलेल्या भागातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. हैदराबाद मनपाची निवडणूक भाजपा पूर्ण ताकदीने लढली.

पक्षाचे मोठमोठे नेते प्रचारात उतरले होते. याचा सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला जबर फटका बसला. १५० सदस्यांच्या मनपात २०१६ ला भाजपाचे फक्त ४ नगरसेवक निवडून आले होते. आता भाजपाचे ४८ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईचे माजी भाजपा अध्यक्ष व बांद्राचे आमदार आशिष शेलार आणि पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी हैदराबाद मनपाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता मुंबई मनपाच्या निवडणुकीत आशिष शेलार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER