मुंबई धारावीतील सर्व आस्थापने बंद; महापालिकेचा निर्णय

BMC

मुंबई : देशात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. त्यातच राजधानी मुंबईत ही संख्या सर्वाधिक आहे. आशिया खंडातली सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता अधिकच वाढली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने धारावीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून मेडिकलव्यतिरिक्त कोणतेही दुकान सुरू राहणार नाही.

धारावीतील फळ, भाज्यांची दुकानं बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. यासंदर्भात पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त यांनी शाहूनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना पत्र लिहिलंय. जी-उत्तर विभागातील फळ, भाज्यांची दुकानं, बाजार बंद करा. फेरीवाल्यांना बसू देऊ नका, असे आदेश पालिकेने दिले आहेत.

धारावीत आता फक्त औषधांची दुकानं सुरू राहतील, बाकी सर्व आस्थापनं बंद राहतील, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका धारावीच्या प्रत्येकांना घरपोच सेवा देणार