कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

BMC - Kangana Ranaut

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणौतच्या (Kangana Ranaut) जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारे अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान कंगणा राणौतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर कंगना आज मुंबईत दाखल होणार असून तिने प्रवासाला सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER