महापालिकेकडून हिंदमाता उड्डाणपुलाखालील केईएम रूग्णालयासाठी ओपीडीची तात्पुरती व्यवस्था

Mumbai Hindmata Flyover

मुंबई : मुंबई शहरात कोरोना विषाणूच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेने हिंदमाता उड्डाणपुलाखाली केईएम रूग्णालयातील ओपीडीची तात्पुरती व्यवस्था केली आहे. मुंबईतील कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विरोधातील लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सेनापती, हे युद्ध आम्ही नक्कीच जिंकू – संजय राऊत

रुग्णालयात जास्त गर्दी होऊ नये म्हणून बीएमसीने हिंदमाता उड्डाणपुलाखालील केईएम रूग्णालयात सुमारे 50 ओपीडी रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक हलविले आहेत. महापालिका त्यांना दिवसातून दोनदा जेवण उपलब्ध करुन देत असून उड्डाणपुलाखालील तात्पुरत्या जागेची व्यवस्था केली आहे. महापालिका अशा रूग्ण आणि त्यांच्या कुटूंबियांची काळजी घेत आहेत जे शहराबाहेरून उपचारासाठी येथे आले आहेत. सध्या कोविड -१९ ला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉक डाऊनमुळे मोठा परिणाम झाला आहे.