कोरोनाबाधित असूनही सार्वजनिक परिसरात वावरणाऱ्या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल

Bollywood Actress Corona Positive - BMC

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील (Mumbai) ओशिवरा परिसरात राहणाऱ्या प्रख्यात चित्रपट अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक परिसरात वावरून शूटिंगमध्येही सहभागी झाल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तिला महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

संबंधित चित्रपट अभिनेत्री बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील ‘के पश्चिम’ विभाग अंतर्गत ओशिवरा परिसरात राहते. कोविडची बाधा झालेली असतानाही ती सार्वजनिक परिसरात वावरली. एवढेच नव्हे तर तिने चित्रीकरणांमध्येही सहभाग घेतला. परिणामी कोविड संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकेल, अशा प्रकारची कृती केल्यामुळे आणि कोविडविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोविडविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. तरी व्यापक हिताच्या दृष्टीने कोविडविषयक नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER