मालमत्ता कराबाबत मुंबई महापालिका संभ्रमात

Property tax - BMC

मुंबई : कोविड -१९ (COVID-19) साथीच्या रोगामुळे यावर्षी सर्वांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय झाला नसल्याने मुंबई महापालिकेने अद्यापही मुंबईकरांनाकर आकारणीचे बिले पाठविली नाहीत. बिले पाठवायची की नाही याबाबत आता संभ्रमाचे वातावरण आहे.

मागील वर्षी ५०० चौरस फूटांपेक्षा कमी जागेत असणाऱ्या घरांसाठी कर माफ करण्याच्या मुद्द्यावरून महानगरपालिकेने प्रक्रिया लांबविली होती. नागरी संस्थेला या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या ६,७६८ कोटी रुपयांची अपेक्षा होती, जी त्याच्या एकूण उत्पन्नाच्या एक चतुर्थांश आहे.

शहरात सुमारे ४.२० लाख मालमत्ता कर भरणाऱ्यांची संख्या असून त्यात १. ३६ लाख घरे असून त्यामध्ये ५०० चौरस फुटापेक्षा कमी जागेत असलेली घरे आहेत. गेल्या वर्षीही या घरांची बिले पाठविली गेली नाहीत. “आम्ही २०२०-२१ मध्ये प्रत्येकासाठी मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. परंतु त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. आम्ही त्याचा पाठपुरावा करीत आहोत आणि म्हणूनच बिले पाठविली गेली नाहीत,” असे महापालिकेने अधिकृतपणे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER