कोविड -१९ केंद्रांचा खर्च बृहनमुंबई मनपा देणार नाही

bmc & covid

मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) यांनी बांधलेल्या चार जंबो कोविड -१९ केंद्रांचा खर्च  बृहनमुंबई  महापालिका देणार नाही, असे मनपाने सरकारला कळवले आहे.

याबाबत मनपाचे आयुक्त इकबाल चहल यांनी राज्याचे मुख्य आयुक्त संजय कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की – कोरोनाच्या साथीच्या काळात आरोग्य सोई उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने ही केंद्रे निर्माण केली आहेत.

ही केंद्रे निर्माण करा असे  बृहनमुंबई  महापालिकेने सांगितले नव्हते. चहल यांनी विनंती केली आहे की, या केंद्रांची देयके मनपाकडे पाठवू नये, असे निर्देश सरकारने संबंधित एजन्सींना द्यावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER