‘ब्लू व्हेल’ गेम भारतासाठी धोक्याची घंटा!

Blue whale game

नागपूर :- जगभरात आतंक माजविणाऱ्या ‘ब्लू व्हेल’ गेमने आतापर्यंत हजारो बळी गेले आहेत. भारतातही या गेमने पाय रोवले आहेत. या गेमच्या आहारी लहान मुले अधिक पडतात. मोबाईलवर हा गेम खेळला जातो. भारतात ‘ब्लू व्हेल’ अनेक मुलांना आपल्या कवेत घेतले. यामुळे भारतात केंद्र सरकारने या गेमवर कायमची बंदी घातली आहे.

मुंबईत काही महिन्यांपूर्वी एका 14 वर्षांच्या मुलाने याच ‘ब्लू व्हेल चॅलेन्ज‘ गेममुळे आत्महत्या केल्याचे समोर आले होते. ‘ब्लू व्हेल चॅलेन्ज’ या गेममुळे झालेली भारतातील ही पहिलीच आत्महत्या होती. ही आत्महत्या त्याने ‘ब्लू व्हेल’ गेमच्या पन्नासाव्या टास्कमुळे केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले होते. त्याने आत्महत्या करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा गुगलवर शोधही घेतला होता असेही स्पष्ट झाले होते.

गेमची सुरूवात

हा गेम व्हीकोन्टाक्टे नावाच्या रशियन साईटवर खेळला जातो. रशियानंतर या गेमने भारत अमेरिका आणि युरोपला टार्गेट केले होते. या गेमचे सूत्रधार डेथ आणि सुसाईड ग्रुप्सच्या माध्यमातून या मुलांना शोधतात. रशियातले असे अनेक ग्रुप्स सरकारने बंद केले आहेत. पण एक डिलीट केल्यावर लगेच दुसरा ग्रुप तयार केला जातो. तसेच आपण टास्क पूर्ण केला हे दाखवायला फोटो ही पाठवावे लागतात.

ब्लू व्हेल गेम कसा झाला सुरू ?

‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा गेम जगभर पसरला आणि आतापर्यंत 19 देशात 200 मुलांचे जीव या देशाने घेतले आहेत. यातले 130 मृत्यू रशियातच झाले आहेत. अमेरिका आणि आफ्रिकेतही अनेकांचे जीव गेले आहेत. ‘द ब्लू व्हेल गेम’ला 25 वर्षांच्या के. फिलीप बुडेकिन या तरुणाने 2013 साली बनवले होते. रशियामध्ये 2015 साली या गेमने पहिला बळी घेतला. त्यानंतर फिलीपला तुरूंगवास ठोठावण्यात आला होता. फिलीपच्या मते हा गेम समाजातील बायोलॉजिकल कचऱ्याच्या साफसफाईसाठी आहे. जे लोक आत्महत्या करतात ते बायॉलोजिकल वेस्ट असतात असे फिलीपचे म्हणने आहे.

हा गेम नक्की काय आहे ?

हा गेम किशोरांना टास्क पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करतो. या गेममध्ये टास्कची सिरीज असते. हे टास्क 50 दिवसांत पूर्ण करायचे असतात. ‘अ साइलेंट हाऊस’, ‘अ सी ऑफ व्हेल्स’ आणि ‘वेक अप मी एट 4.20 ए एम’ असे या टास्कची नावे असतात आणि शेवटी जो मृत्यूला कवटाळतो तोच जिंकतो.

इन्स्टाग्रामने या गेम विरूद्ध पाऊले उचलली

दोन रशियन मुलांनी इन्स्टाग्रामवर या गेमचे फोटो पोस्ट केल्यानंतर हा गेम बातम्यांमध्ये आला होता. त्यामुळे इन्स्टाग्रामने या गेम विरूद्ध पाऊले उचलली आहेत. आता या गेमचे फोटो टाकत असल्यास इन्स्टाग्रामवर वॉर्निंगही येते.

या गेमच्या विळख्यात कोण येऊ शकते ?

जे सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा प्रचंड वापर करतात

जे इंटरनेट गेमिंग अडिक्ट आहेत. हा गेम खेळू लागल्यानंतर माणूस चिडचिडा आणि उदास होतो. जर मुलात हे बदल दिसत असतील तर लगेच काळजी घेतली पाहिजे.

ही बातमी पण वाचा : नागपूरात ‘ब्लू व्हेल’ गेमने गेला मुलीचा बळी, हात कापून घेतला गळफास

या गेमवर उपाय काय?

– मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन मुलांचे काउंसिलिंग केले पाहिजे.

– पालकांनी मुलासोबत जास्त वेळ घालवत आपले नाते घट्ट बनवले पाहिजे.

– मुलांना मोबाईलपासून दूर करण्यासाठी उपाय करा.

– एकदम जबरदस्ती न करता पहिले दिवसातले गेम खेळण्याचे तास कमी करा

– त्यानंतर गेम खेळण्याची सवय आठवड्यातून एकदा खेळण्यापर्यंत आणली जाते आणि अखेर ही सवय मोडली जाते.